LIVE - दुर्दैवाने आमच्या शेजारी राष्ट्राकडूनच दहशतवादाला खतपाणी – मोदी
By admin | Published: October 16, 2016 12:24 PM2016-10-16T12:24:21+5:302016-10-16T12:24:21+5:30
जगभरातील दहशतवादाचे मूळ या देशाशी संबंधीत आहे, तो देश दहशतवाद्यांचा आश्रयस्थान आहे. दहशतवादाचा सर्वांनाच धोका, दुर्दैवाने आमच्या शेजारी राष्ट्राकडूनच दहशतवादाला खतपाणी
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १६ - तीन दिवसाच्या ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. भारतासह चीन, रशिया, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका अशा एकूण ११ देशांचे प्रतिनिधी ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४२ टक्के लोकसंख्या असलेल्या देशांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान तसेच काही केंद्रीय मंत्री व वरिष्ठ अधिकारी या परिषदेत भाग घेतल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवसाच्या चर्चेस सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आहे. ब्रिक्स राष्ट्रांमधील संबंध, व्यापार, व्यवहार, गुंतवणूक याविषयी ब्रिक्स परिषदेत चर्चा सुरु आहे. मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपयीक्ष चर्चा पार पडली. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांच्या राष्ट्रअध्यक्षांशी चर्चा करत आहेत . यामध्ये मुख्यत: दहशतवादावर चर्चा सुरु आहे.
- जगभरातील दहशतवादाचे मूळ या देशाशी संबंधीत आहे, तो देश दहशतवाद्यांचा आश्रयस्थान आहे - मोदी
- दहशतवादाचा सर्वांनाच धोका, दुर्दैवाने आमच्या शेजारी राष्ट्राकडूनच दहशतवादाला खतपाणी – मोदी
- ब्रिक्समधील देश शांतता, सुधारणेसाठी ओळखले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ब्रिक्स देशांना शांती, सुधारणा आणि निश्चयपूर्ण कृतींचा आवाज बनावे लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोरबे यांच्यात द्विपक्षीय चर्चा
- ब्रिक्स देशांच्या नेत्यांची विस्तारीत बैठक सुरू
- श्रीलंका, नेपाळ आणि भूतान या देशांचे नेतेही गोव्यात दाखल झाले आहेत. रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी भूतानच्या पंतप्रधानांचाही भेट घेतली
Salcete: Welcome ceremony of BRICS leaders in Goa #BRICSSummitpic.twitter.com/ANG3PmEO1C
— ANI (@ANI_news) October 16, 2016