Lok Sabha Election 2019 Result: उत्तर गोव्यात श्रीपाद नाईकांची आघाडी, दक्षिण गोव्यातून सावईकर पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:31 PM2019-05-23T12:31:35+5:302019-05-23T12:32:17+5:30

भाजपाचा वरचष्मा असलेल्या गोवा राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत.

Lok Sabha Election 2019 Result: Shreepad Naik's lead in Goa, Savaiikar trailing south Goa | Lok Sabha Election 2019 Result: उत्तर गोव्यात श्रीपाद नाईकांची आघाडी, दक्षिण गोव्यातून सावईकर पिछाडीवर

Lok Sabha Election 2019 Result: उत्तर गोव्यात श्रीपाद नाईकांची आघाडी, दक्षिण गोव्यातून सावईकर पिछाडीवर

Next

पणजीः भाजपाचा वरचष्मा असलेल्या गोवा राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. उत्तर गोवा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपानं विजय मिळवला होता. भाजपाच्या श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून रवी नाईक यांचा पराभव केला होता. तर दक्षिण गोवा मतदारसंघातून नरेंद्र सावाईकरांनी काँग्रेसच्या उमेदवारावर मात करत विजय मिळवला होता. या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपा तयार असून, काँग्रेसचा इथे निभाव लागतोय का, याचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. 

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवरच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना 99672 मतं मिळाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवाराला 72758 हजार मत मिळत आहेत.  तर दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे फ्रांसिस्को कॅटानो सरडिन्हा यांना 97417 मतं मिळाली आहेत. तर नरेंद्र सावईकर यांना 95358 मतं मिळाली आहेत. त्यामुळे उत्तर गोव्यात भाजपाला विजय मिळण्याची शक्यता असून, दक्षिण गोव्यातून भाजपाचा पराभव होण्याचा अंदाज आहे. गोव्यात एकूण 1135811 मतदार असून, यंदा 74.94 टक्के मतदान झालं आहे. 

Web Title: Lok Sabha Election 2019 Result: Shreepad Naik's lead in Goa, Savaiikar trailing south Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.