गोव्यात प्रथमच भाजप-काँग्रेस यांच्यात कडवी झुंज; आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांमध्ये लक्षवेधी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 10:49 AM2024-04-28T10:49:08+5:302024-04-28T10:49:34+5:30
गेली पंचवीस वर्षे भारतीय जनता लोकसंख्या मतदार महिला मतदार पक्ष उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकतोय.
पणजी - सदगुरू पाटील
पणजी : गेली पंचवीस वर्षे भारतीय जनता लोकसंख्या मतदार महिला मतदार पक्ष उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकतोय. दोनवेळा भाजपने मध्यंतरी दक्षिण गोवा मतदारसंघही जिंकला होता. पण यावेळी दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आव्हानात्मक स्थिती आहे. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात भाजपने तुलनेने सुरक्षित आहे. पण तिथेही आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांमधील ही लढत लक्षणीय ठरू लागली आहे. तर, दक्षिण गोव्यात भाजपने प्रथमच महिला उमेदवाराला संधी दिली असली तरीही त्यांना निवडणूक आव्हानात्मक आहे.
एकूण मतदारसंघ
लोकसंख्या-१६ लाख
मतदार-११.७९ लाख
महिला मतदार-६.०७
पुरुष मतदार-५.७१ लाख
दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार सर्वात श्रीमंत
भाजपने प्रथमच आपल्या केडरबाहेरील उमेदवार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून भाजपने प्रथमच महिलेला उमेदवारी दिली. पल्लवी धेपे ह्या गोव्यातील सर्वात
श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्याकडे बाराशे कोटींची मालमत्ता आहे.
त्या राजकारणात प्रथमच आल्या आहेत. त्यांना भाजपचे कार्यकर्ते व मतदार कशा प्रकारे
स्वीकारतात ते अजून पहावे लागेल.
तर धेपे यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे केप्टन विरियातो फर्नांडिस हे लढत आहेत. विरियातो
हे आयुष्यात प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
१९९९ पासून अभेद्य राहिलेला गड भाजप टिकविणार का?
• १९९९ सालापासून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. ते एकदाही पराभूत झाले नाही. मात्र आता सहाव्यांदा लढताना नाईक यांची दमछाक होत आहे. कारण २५ वर्षे भाजपने उमेदवार बदलला नाही, म्हणून युवा मतदारांत थोडी चलबिचल आहे.
यावेळी माजी केंद्रीय कायदा मंत्री • रमाकांत खलप हे नाईक यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे लढत आहेत. नाईक यांच्या अकार्यक्षमतेवर आपण प्रचारावेळी भर देतोय, असे खलप सांगतात. उत्तर गोव्यातून रिवोलुशनरी गोवन्स ह्या पक्षातर्फे मनोज परब रिंगणात आहेत.