पल्लवी धेंपे २८३ कोटी रुपयांच्या मालकीण! निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 09:59 AM2024-04-17T09:59:59+5:302024-04-17T10:02:02+5:30

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची मालमत्ता १२ कोटींची; उमेदवारी अर्ज सादर.

lok sabha election 2024 pallavi dempo is the owner of 283 crore clear in the election affidavit | पल्लवी धेंपे २८३ कोटी रुपयांच्या मालकीण! निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट

पल्लवी धेंपे २८३ कोटी रुपयांच्या मालकीण! निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पल्लवी धेपे यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण २८३ कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तरी त्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार तथा श्रीपाद नाईक यांनी सुमारे १२ कोटींची मालमत्ता दाखवली आहे. दोघांनीही काल आपापले उमेदवारी अर्ज सादर करताना ही मालमत्ता जाहीर केली आहे.

गोव्यातील थेंपे उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेपे यांची पत्नी पल्लवी किती कोटींच्या मालकीण आहे याबाबत लोकांमध्ये उत्कंठा होती. पल्लवी यांनी आपल्या हातातील रोख ४०१४६ रुपये तर पती श्रीनिवास यांच्या हातातील रोख ६,५६,१४२ रुपये दाखवली आहे.

पल्लवी या उच्चशिक्षित असून पुणे येथील एमआयटी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी १९९७ साली बिझनेस मॅनेजमेंटची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांचे पदवीचे शिक्षण मात्र गोव्यातच मडगावला झाले आहे.

पल्लवी धेपे यांची मालमत्ता

सुवर्णालंकार : ३,७५३.३४ ग्रॅम वजनाचे आजच्या बाजारभावाने ५ कोटी ६९ लाख ७८ हजार ८७३ रुपयांचे सुवर्णालंकार त्यांनी
दाखवले आहेत.

बँकांमधील स्वतःच्या नावावरील ठेवी : ९ कोटी ९१ लाख ३१ हजार ६४६ रुपये.

पोस्टातील बचत, विमा पॉलिसी : १२ कोटी ९२ लाख १४ हजार १२१ रुपये

इतर मालमत्ता ९ कोटी ७५ लाख ६११ रुपये ४३ हजार.

वाहन नाही

पल्लवी यांनी स्वतःच्या नावावर मोटारी दाखवलेल्या नाहीत. मात्र पती श्रीनिवास यांच्या नावावर २ कोटी ५४ लाख २ हजार ९१ कोटी रुपयांच्या मोटारी दाखवलेल्या आहेत.

कोट्यवधींचे रोखे

रोख्यांमधील पल्लवी यांची गुंतवणूक : २१७ कोटी २१ लाख ८९ हजार ५१० रुपये आहे. तर पती श्रीनिवास यांच्या नावे ७९२ कोटी ३८ लाख २ हजार २०७ रुपयांचे रोखे असून दोघांची मिळून रोख्यांमधील गुंतवणूक २००१ कोटी रुपये होते. त्यांच्या मूळ संपत्तीत याचा समावेश केला तर त्यांची एकूण मालमत्ता १२९२ कोटींच्या घरात जाते.

पती श्रीनिवास धेपे यांच्या नावे मालमत्ता

एकूण मालमत्ता : ९९४.८३ कोटी

बँक ठेवी: २४ कोटी ५ लाख ५३ हजार ६५९ रुपये

पोस्टातील बचत, विमा पॉलिसी : ६७ कोटी ४५ लाख ८५ हजार ९४० रुपये.

इतर मालमत्ता : ९ कोटी ४४ लाख ६४ हजार ५९५ रुपयांची दाखवली आहे.

पती श्रीनिवास यांच्या नावावर मोटारी

मर्सिडीझ बेंझ १ कोटी ६९ लाख ६० हजार १७८ रुपये

महिंद्रा थार १६ लाख २६ हजार २५३ रुपये

कॅडिलॅक ३० लाख रुपये

मर्सिडीझ बेंझ १६ लाख ४२ हजार २४० रुपये

मर्सिडीझ बेंझ २९ लाख ७३ हजार ५०० रुपये

श्रीपादभाऊ यांची मालमत्ता

उत्तर गोव्याचे भाजप उमेदवार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्थावर व जंगम मिळून १२ कोटींची मालमत्ता अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवली आहे. २०२२-२३ चे उत्पन्न त्यांनी १७ लाख ६३ हजार रुपये दाखवले आहे. हातातील रोख रक्कम १ लाख १९ हजार २८१ रुपये दाखवली आहे.

बँक ठेवी (एफडी व टर्म डिपॉझिट) : १७ लाख २३ हजार ४३१ रुपये

रोखे/शेअर्स / म्युच्युअल फंड : २२ लाख ६९ हजार ६२३ रुपये

पोस्टातील बचत / विमा पॉलिसी : ३ लाख २९ हजार १४४ रुपये

मोटारी व वाहने: १५ लाख ३४ हजार ८१५ रुपये

दागिने : ६ लाख ९० हजार २०४ रुपये

इतर मालमत्ता : १९ लाख ३५ हजार ४२४ रुपये

वार्षिक उत्पन्न

२०१९-२० : १२ लाख ४९ हजार ४३० रुपये 
२०२०-२१ : ६ लाख ७३ हजार १३० रुपये 
२०२१-२२ : १ लाख २२ हजार ९१० रुपये
२०२२-२३: १७ लाख ६३ हजार २५० रुपये

कोट्यवधीची जमीन, व्यावसायिक इमारती

याशिवाय बाजारभावानुसार २६ लाख २५ हजार रुपये किमतीची कृषी जमीन व ५ कोटी १९ लाख ८० हजार रुपये किमतीची बिगर कृषी जमीन दाखवली आहे. १ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये किमतीच्या व्यावसायिक इमारतींची मालकी दाखवली आहे. निवासी घर बाजारभावानुसार ८ कोटी ८१ लाख १५ हजार रुपये किमतीचे दाखवले आहे. स्वतःच्या डोक्यावर ५ लाख ८ हजार रुपये कर्जही त्यांनी दाखवले आहे.

शिक्षण

बीए पदवीधर असून १९७८ साली धेपो कॉलेजमधून त्यांनी ही पदवी घेतली आहे.

 

Web Title: lok sabha election 2024 pallavi dempo is the owner of 283 crore clear in the election affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.