उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक ‘डबल हॅट्ट्रिक’ करतील?
By मयुरेश वाटवे | Published: May 2, 2024 06:55 AM2024-05-02T06:55:32+5:302024-05-02T06:55:45+5:30
श्रीपाद नाईक या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रात त्यांनी विविध मंत्रिपदेही भूषवली आहेत. मात्र, यंदा प्रस्थापितविरोधी मतांचा काहीसा फटका त्यांना जाणवू लागला आहे.
मयुरेश वाटवे
पणजी : उत्तर गोव्यातून सतत पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळी डबल हॅटट्रिक साधेल का याबद्दलची उत्सुकता आहे. काँग्रेसने यंदा माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने या मतदारसंघात रंगत वाढली आहे.
श्रीपाद नाईक या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रात त्यांनी विविध मंत्रिपदेही भूषवली आहेत. मात्र, यंदा प्रस्थापितविरोधी मतांचा काहीसा फटका त्यांना जाणवू लागला आहे.
नाईक यांचे मतदारसंघात चांगले वैयक्तिक संबंध आहेत. रमाकांत खलप यांच्या विषयी जुन्या मतदारांना काहीशी आत्मीयता आहे. त्याचा फटका श्रीपादना बसू शकतो. त्यावर मात करून ते डबल हॅटट्रिक करतात का, याकडे लक्ष लागले आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
प्रस्थापितविरोधी कौल, बेरोजगारीचा मुद्दा, युवावर्गात नाराजी
खलप यांनी म्हापसा अर्बन बँक बुडवली हा मुद्दा त्यांच्या विरोधात वापरला जात आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशी होऊ शकते असे अलीकडेच मुख्यमंत्री म्हणाले होते.
दक्षिण गोवा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या कथित राज्यघटनाविरोधी वक्तव्याचे भाजपकडून भांडवल पंतप्रधानांनीही देशपातळीवर हा मुद्दा उपस्थित केला आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
श्रीपाद नाईक
भाजप (विजयी)
२,४४,८४४
गिरीश चोडणकर
काँग्रेस
१,६४,५९७