मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची माहिती
By पूजा प्रभूगावकर | Updated: May 29, 2024 17:11 IST2024-05-29T17:09:44+5:302024-05-29T17:11:13+5:30
लोकसभा निवडणूकीसाठी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची माहिती
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: लोकसभा निवडणूकीसाठी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी दुपारी एक वाजे पर्यंत पूर्ण होऊन चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी सांगितले.
उत्तर गोव्यात मतमोजणी आल्तिनो येथील गोवा पॉलिटेक्निक कॉलेज तर दक्षिण गोव्यात मतमोजणी ही मडगाव येथील दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स येथे होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल .मुख्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शकतत्वांनुसार मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.
वर्मा म्हणाले, की उत्तर गोव्यात ६५० व दक्षिण गोव्यात ६५० असे मिळून एकूण १३०० कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केली आहे. यात प्रत्येकी १५७ निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. स्ट्राॅंग रुम पासून ते मतमोजणी केंद्रां पर्यंत ईव्हीएम मशिन्स सुरक्षितरित्या नेण्यासाठी खास कॉरिडॉर तयार केले जातील.लोकसभा निवडणूकीसाठीची मतमोजणी सात ते आठ फेऱ्यांमध्ये होईल असे त्यांनी सांगितले.