लोकायुक्तांना प्रतीक्षा सभापतींच्या मालमत्तेच्या तपशीलाची...

By Admin | Published: September 28, 2016 01:54 AM2016-09-28T01:54:58+5:302016-09-28T01:58:25+5:30

पणजी : लोकायुक्तांनी राज्यातील सर्व आमदार व मंत्र्यांना मालमत्तेचा तपशील सादर करण्यास दिलेली दोन महिन्यांची अतिरिक्त मुदतही संपुष्टात आली आहे.

Lokayukta waiting for details of assets of the sitting chair ... | लोकायुक्तांना प्रतीक्षा सभापतींच्या मालमत्तेच्या तपशीलाची...

लोकायुक्तांना प्रतीक्षा सभापतींच्या मालमत्तेच्या तपशीलाची...

googlenewsNext

पणजी : लोकायुक्तांनी राज्यातील सर्व आमदार व मंत्र्यांना मालमत्तेचा तपशील सादर करण्यास दिलेली दोन महिन्यांची अतिरिक्त मुदतही संपुष्टात आली आहे. बहुतेक सर्व मंत्री व आमदारांनी मालमत्तेचा तपशील लेखी स्वरूपात लोकायुक्त कार्यालयास सादर केलेला आहे; पण सभापती असलेले मयेचे आमदार अनंत शेट यांनी अजूनही माहिती सादर केलेली नाही. लोकायुक्त कार्यालय आता त्यांना आणखी एकदा अखेरचे स्मरणपत्र पाठविण्याची शक्यता आहे.
गेल्या जून महिन्यात लोकायुक्तांनी लोकायुक्त कायद्यानुसार जाहीर नोटीस देऊन गोवा विधानसभेच्या सर्व सदस्यांना मालमत्तेचा तपशील सादर करण्यास सांगितले होते. प्रारंभी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या वेळी मोजक्याच सदस्यांनी मालमत्तेचा तपशील सादर केला. त्यानंतर दोन महिन्यांची मुदत आमदारांना देण्यात आली. मंत्र्यांना स्मरणपत्रे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत तर आमदारांना राज्यपालांच्या कार्यालयामार्फत लोकायुक्त पाठवत असतात.
चाळीसपैकी बहुतेकांनी मालमत्तेचा तपशील दिला. पाच आमदारच माहिती देणे बाकी होते. त्यापैकी तिघा-चौघांनी अलीकडेच लोकायुक्त कार्यालयात लेखी स्वरूपात माहिती दिली; पण सभापती शेट यांच्याकडून माहिती सादर झालेली नाही. लोकायुक्त कार्यालय थोडी प्रतीक्षा करेल व नंतर एक अहवाल तयार करून तो अहवाल सरकारला पाठविला जाणार आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Lokayukta waiting for details of assets of the sitting chair ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.