क्रीडा स्पर्धेविषयी 'लोकमत'चे वेगळेपण; गोविंद गावडे यांच्याकडून सकारात्मक वार्तांकनास दिलखुलास दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 08:00 AM2023-11-15T08:00:17+5:302023-11-15T08:00:42+5:30
'लोकमत'ने वेगळेपण दाखवले, असे गौरवोद्गार क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर कीर्तिमान व्हावे, या हेतूने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी 'लोकमत'ने आम्हाला पूर्ण सहकार्य करत छान प्रसिद्धी दिली. 'लोकमत'ने वेगळेपण दाखवले, असे गौरवोद्गार क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला सुवर्णपदक प्राप्त करून दिलेल्या क्रीडापटूंचा सन्मान सोहळा ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे मंगळवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांनी क्रीडा स्पर्धेला दिलेल्या एकूणच प्रसिद्धीसाठी 'लोकमत'चे त्यांनी कौतुक केले. 'लोकमत'ने क्रीडा स्पर्धेविषयी चांगली प्रसिद्धी दिली. राष्ट्रीय स्तरावर गोव्याची प्रतिमा जपली जावी, या हेतूने सकारात्मक बातमी छापली. त्यामुळे या स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रबळ इच्छाशक्तीचे बळ मिळाले, असे त्यांनी सांगितले.
केवळ आयोजनच नव्हे, तर यशस्वीही केल्या. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी अन्य राज्ये सुद्धा तयार होती. मात्र, गोव्याने या क्रीडा स्पर्धा केवळ आयोजित केल्या नाहीत, तर त्या यशस्वीही केल्या. त्यासाठी केवळ अधिकारी वर्गच नाही, तर ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी योगदान दिले, त्यांचे सर्वांचे आभार व कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा यशस्वी करण्याचा होता विश्वास
मंत्री गावडे म्हणाले की, राष्ट्रीय क्री स्पर्धांचे आयोजन वारंवार पुढे ढकलले जात होते. त्यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजित होणार तरी कधी? असा प्रश्न जेव्हा कधी आपल्याला केला, तेव्हा आपण डिसेंबर २०२३ पर्यंत त्या होतील, तुम्ही निश्चित राहा, असेच उत्तर दिले. कारण, या स्पर्धा यशस्वीपणे पार पडतील, यावर आपला विश्वास होता.
ऐनवेळी पाऊस - पडला, तरीही....
या क्रीडा स्पर्धेवेळी ऐनवेळी पाऊस पडला. तरीही आम्ही मागे हटलो नाही. यालाच म्हणतात नियोजन, आयोजन व प्रशासन प्रशासन हे पारदर्शकपणे तसेच ऑन ग्राऊंडवर उतरुन करा, इतकेच आपण त्यांना सांगितले होते. देशाच्या विविध भागांतून आलेले खेळाडू हे आमचे पाहुणे होते. त्यांचे भावनिक पद्धतीने स्वागत केले. काहींनी या स्पर्धेच्या आयोजनावरून टीका केली.
९२ पदके ही मोठी उपलब्धी : गावडे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंना तब्बल ९२ पदके मिळाली. मुख्यमंत्री सातत्याने गावडे यांच्या पाठीशी राहिले व त्यांनी गावडे यांना नेहमीच समर्थन दिले हे मंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले. याबाबतीत पक्षाची भूमिका काय? हे विचारण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.