सर्वात मोठ्या उद्योग घराण्याची सून रिंगणात; दक्षिण गोवा मतदारसंघात लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:03 AM2024-04-25T09:03:32+5:302024-04-25T09:04:16+5:30

भारतीय राज्यघटना गोव्यावर लादली गेली असे वादग्रस्त विधान केल्यानंतर विरियातो हे टीकेचे धनी झाले आहेत. पंतप्रधानांनी देखील विरियातो यांच्यावर टीका केली. 

Loksabha Election - Pallavi Dhempe, daughter-in-law of Dhempe, who is the largest industrialist family in Goa, in the election arena | सर्वात मोठ्या उद्योग घराण्याची सून रिंगणात; दक्षिण गोवा मतदारसंघात लागणार कसोटी

सर्वात मोठ्या उद्योग घराण्याची सून रिंगणात; दक्षिण गोवा मतदारसंघात लागणार कसोटी

सदगुरू पाटील

पणजी : धेंपे गोव्यातील सर्वात मोठे उद्योग घराणे. या कुटुंबातील सून पल्लवी धेंपे आयुष्यात प्रथमच आता लोकसभा निवडणूक लढवत आहे. पल्लवी यांचा मार्ग खडतर असून त्यांची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कसोटीच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण गोव्यात महिला उमेदवारच हवा अशी सूचना केल्यानंतर भाजपने पल्लवी यांना तिकीट दिले. दक्षिणेची जागा तूर्त काँग्रेसकडे आहे. मात्र, यावेळी काँग्रसतर्फे कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे लढत आहेत. विरियातो देखील  प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. इंडिया आघाडीने विरियातो यांच्या प्रचाराला धार आणली आहे. मात्र भारतीय राज्यघटना गोव्यावर लादली गेली असे वादग्रस्त विधान केल्यानंतर विरियातो हे टीकेचे धनी झाले आहेत. पंतप्रधानांनी देखील विरियातो यांच्यावर टीका केली. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मोदी सरकारची विकास कामे, केंद्र सरकारची भ्रष्टाचारविरोधी कारवाई, गोव्यातील नागरिकांसाठी दुहेरी नागरिकत्वाची मागणी, गोव्याला खास दर्जा देण्याचा आग्रह, वाढती महागाई व बेरोजगारी

काँग्रेसचे उमेदवार विरियातो हे भारतीय घटनेच्या विरोधात वक्तव्ये करत असल्याची भाजपची निवडणूक आयोगाकडे व पोलिसांतही तक्रार केली आहे. मात्र अद्याप त्यावर निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले.

 २०१९ मध्ये काय घडले?

फ्रान्सिस सार्दिन
काँग्रेस (विजयी)
२,०१,५६१

नरेंद्र सावईकर
भाजप
१,९१,८०६
 

Web Title: Loksabha Election - Pallavi Dhempe, daughter-in-law of Dhempe, who is the largest industrialist family in Goa, in the election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.