म्हापशात भरदिवसा बँक आॅफ इंडियात लूट

By Admin | Published: July 23, 2015 02:04 AM2015-07-23T02:04:07+5:302015-07-23T02:04:43+5:30

बार्देस : सकाळी दहाची वेळ. बँक आॅफ इंडियाच्या म्हापसा शाखेतील महिला कॅशियरने १२.१0 लाख तिजोरीतून बॅगेत भरले. आपल्या केबिनमध्ये बॅग

Loot in Bharadwiya Bank of India in Mapusa | म्हापशात भरदिवसा बँक आॅफ इंडियात लूट

म्हापशात भरदिवसा बँक आॅफ इंडियात लूट

googlenewsNext

बार्देस : सकाळी दहाची वेळ. बँक आॅफ इंडियाच्या म्हापसा शाखेतील महिला कॅशियरने १२.१0 लाख तिजोरीतून बॅगेत भरले. आपल्या केबिनमध्ये बॅग ठेवून तिने केबिनसमोर उभ्या असलेल्या ग्राहकाशी वार्तालाप सुरू केला. काही वेळानंतर आठ-दहा ग्राहक अचानक लगबगीने बँकेबाहेर पडले. त्या कॅशियरच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. संशयापोटी तिने आपल्या आसनामागील पैशाच्या बॅगेला हात घातला आणि
तिच्या काळजात धस्स झाले! तब्बल १२.१0 लाखांची रोख रक्कम भरलेली ती बॅग गायब झाली होती...
म्हापसा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुती मंदिराजवळील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत बुधवारी सकाळी ही चोरीची घटना घडली. हा परिसर गजबजलेला असल्याने चोरीची घटना कळताच शहरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच म्हापशाचे पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, इतर पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासकार्य हाती घेतले. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता बँकेचा दरवाजा उघडण्यापूर्वी १५ ते २० लोक बाहेर थांबले होते. दरवाजा उघडताच सर्वजण आत घुसले. बँकेचे कर्मचारी आपापल्या केबिनमध्ये तसेच कामाच्या ठिकाणी स्थानापन्न झाले. कॅशियर नीशा साळकर यांनी तिजोरीतील रोकड मोजून आपल्याकडील बॅगेत भरून त्या केबिनमध्ये आल्या. त्याचवेळी केबिनसमोर थांबलेल्या ग्राहकाने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यामुळे केबिनच्या दरवाजाला कडी घालायला त्या विसरल्या. बोलण्याच्या ओघात रोख रक्कम भरलेली बॅग त्यांनी आपल्या बैठकीच्या मागे ठेवली. बहुतेक ग्राहक बँकेतील खुर्च्यांवर बसून होते, तर काहीजण उभे राहून बोलत होते. या संधीचा फायदा घेत चोर प्रवेशबंदी असलेल्या जागेतून शेवटच्या केबिनकडे गेला. कॅशियर नीशा साळकर यांच्या केबिनचा दरवाजा उघडाच होता व त्या ग्राहकाशी बोलण्यात गुंतल्या होत्या. (पान २ वर)

Web Title: Loot in Bharadwiya Bank of India in Mapusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.