मडगाव बॉम्बस्फोट खटला उच्च न्यायालयात प्रलंबित
By admin | Published: September 23, 2015 01:35 AM2015-09-23T01:35:38+5:302015-09-23T01:35:49+5:30
मडगाव : दिवाळीच्या पूर्वसंध्येस मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित असलेले सनातनचे सहा साधक खास न्यायालयाकडून निर्दोष मुक्त झाले
मडगाव : दिवाळीच्या पूर्वसंध्येस मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित असलेले सनातनचे सहा साधक खास न्यायालयाकडून निर्दोष मुक्त झाले असले, तरी त्यांच्या विरोधात एनआयएने उच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका अजूनही प्रलंबित आहे. २0१३ साली दाखल केलेली ही याचिका सुनावणीस येण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना उच्च न्यायालयाने यापूर्वीच नोटिसा पाठविल्या आहेत.
१६ आॅक्टोबर २00९ रोजी मडगावात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने सनातनशी संबंध असलेल्या धनंजय अष्टेकर व इतर पाच संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, तांत्रिक त्रुटी व अन्य कारणांसाठी खास न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी या सर्व संशयितांना निर्दोष मुक्त केले होते. याच आदेशाला एनआयएने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या हे अपील उच्च न्यायालयाने दाखल करून घेतले असले, तरी २0१0 पर्यंत दाखल केलेल्या अपिलांची सुनावणी होत असल्याने २0१३ साली दाखल केलेले हे अपील उच्च न्यायालयासमोर येण्यासाठी किमान एक वर्ष जाईल, असा अंदाज आहे.
(पान २ वर)