‘महाराजा एक्स्प्रेस’ चार राज्यांतून धावणार - प्रभू
By admin | Published: April 10, 2017 03:29 AM2017-04-10T03:29:15+5:302017-04-10T03:29:15+5:30
‘महाराजा एक्स्प्रेस’ या वर्षापासूनच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळच्या पर्यटन पट्ट्यात धावेल
पणजी : ‘महाराजा एक्स्प्रेस’ या वर्षापासूनच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळच्या पर्यटन पट्ट्यात धावेल. त्यामुळे या राज्यांमध्ये पर्यटकांचे प्रमाण वाढेल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले.
प्रभू यांच्या हस्ते येथील ‘मॅकेनिज पॅलेस’मध्ये रिमोटद्वारे काही प्रकल्पांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर विलवडे-राजापूर स्टेशनच्यामध्ये सौंदळ या नव्या स्टेशनचे त्यांनी उद्घाटन केले. मंगळूरुनजवळ थोकूर रेल्वे स्टेशनमध्ये माल हाताळण्याच्या व्यवस्थेचा प्रारंभ झाला. या भागात सेझमध्ये येऊ घातलेल्या ३०० उद्योगांना त्यांचा लाभ होणार आहे.
लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर व खेड येथे टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. त्याशिवाय कंट्रोल आॅफिस अॅप्लिेकशन, भारतीय स्टेट बँक, एक्झीम बँक यांच्याबरोबर कोकण रेल्वेने १,२00 कोटी रुपयांचा मुदत क र्ज करार केला. रोहा ते वीर रेल्वे मार्ग दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणासाठी हा निधी वापरला जाईल. (प्रतिनिधी)