Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:11 PM2022-06-30T13:11:28+5:302022-06-30T13:12:10+5:30

महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला.

Maharashtra Political Crisis: "Respect for Uddhav Thackeray but he did not leave Congress-NCP till the end" Says Deepak Kesarkar mla from Eknath Shinde Group | Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही"

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही"

Next

गोवा - काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवारासमोर पराभूत झालेल्या नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. आम्ही पक्षप्रमुखांना या तक्रारी मांडल्या. राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार पडला. महाविकास आघाडीत राहून आमचा काय उपयोग होता? सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मग नेमंक काय झाले याची विचारणा पक्षप्रमुखांनी करायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठलेही सेलिब्रेशन आमच्या आमदारांनी केले नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

आमदार दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले. उद्धव ठाकरेंचे मन दुखवावे, अपमान व्हावा असा कुठलाही हेतू नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढताना स्वकीयांशीही लढावं लागले. आम्ही दीड वर्ष झाले आपली नैसर्गिक युती आहे. ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढलो त्यासोबत आपण राहावं ही आमची भूमिका होती. वेळोवेळी आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. संभ्रमावस्था निर्माण होईल अशी वक्तव्ये, बातम्या पसरवल्या गेल्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमदार एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेतले जात नाहीत. आमदारांमध्ये चलबिचल होईल यासाठी मंत्रिमंडळाची संभाव्य यादी पसरवली गेली. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आमच्या नेत्याशी आम्हाला अप्रत्यक्ष लढावं लागलं. आमची भूमिका विचारात न घेतल्याने हा संघर्ष निर्माण झाला. भाजपासोबत आमची मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा नाही. एकही आमदार मंत्रिपदाच्या आशेने आले नाहीत. जे आलेत त्यातील ६ विद्यमान मंत्री होते. बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार होता तो पुढे घेऊन जाण्यासाठी ते यात सहभागी झाले असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. 

कुणीही वाईट वाटून घेऊ नये 
कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.  
 

Web Title: Maharashtra Political Crisis: "Respect for Uddhav Thackeray but he did not leave Congress-NCP till the end" Says Deepak Kesarkar mla from Eknath Shinde Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.