म्हादईप्रश्नी महाराष्ट्र मदत करेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:04 AM2023-12-01T11:04:11+5:302023-12-01T11:04:24+5:30

कुणकेरी येथे देवदर्शन

Maharashtra will help in mhadei river issue said chief minister pramod sawant | म्हादईप्रश्नी महाराष्ट्र मदत करेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

म्हादईप्रश्नी महाराष्ट्र मदत करेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, सावंतवाडी : म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गोवा नक्की जिंकेल आणि आम्हाला महाराष्ट्रही मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, पाच राज्याच्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करीत आहे. तीन राज्यात भाजप सत्तेवर येईल तर दोन राज्यात चांगली कामगिरी करेल, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री सावंत हे कुणकेरी येथे देवदर्शनानिमित्त आले होते. त्यावेळी माजी आमदार राजन तेली यांच्या सावंतवाडीतील कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रथमेश तेली, मनोज नाईक, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंड्या सावंत, प्रमोद सावंत, सुधीर आडिवरेकर, अमित परब, केतन आजगावकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, म्हादईप्रश्नी गोवा सरकार आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात जोमाने मांडत आहे. यात नक्कीच यश मिळेल. म्हादईच्या लढ्यात महाराष्ट्र सरकारही आम्हाला मदत करेल.' 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच रुग्ण हे गोव्यात बांबोळी येथे येतात. त्यांना तेथे पुरेशा आरोग्य सुविधा आम्ही देतो. मात्र यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनआरोग्य योजनेचे कार्ड हे सरकारी रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांतही त्याचा वापर झाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करेन' असे यावेळी त्यांनी सांगितले.

 

Web Title: Maharashtra will help in mhadei river issue said chief minister pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.