एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा

By वासुदेव.पागी | Published: September 1, 2023 06:07 PM2023-09-01T18:07:17+5:302023-09-01T18:07:31+5:30

केंद्र सरकारने या प्रस्तावासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्त केली आहे.

Maharashtrawadi Party supports NDA's One Country One Election proposal | एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा

एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा

googlenewsNext

पणजी: केंद्र सरकारने  एक देश एक निवडणूक धोरणाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे आता देशभर या प्रस्तावाच्या समर्थमार्थ तसेच विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेही आपली भुमिका स्पष्ट केली आहे.  

केंद्र सरकारने या प्रस्तावासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्त केली आहे. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी माद्यमांशी बोलातना सांगितले की एक देश एक निवडणूक धोरण राबविण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा अत्यंत महत्वपूर्ण आहे.

महाराष्ट्रवादी पक्ष या निर्णयाचा स्वागत करीत आहे. एक देश एक निवडणूक धोरण हे देशाच्या हितासाठी आहे. निवडणुंकावर होणारा अतिरिक्त खर्च वाचणार आहे असे ते म्हणाले. तसेच असे केल्यामुळे निवडणूक आचार संहिताही अधिकवेळा जारी करावी लागणार नाही. आचार संहिता लागू असल्यास विकास कामांना खिळ बसते, फायली सरकत नाहीत. एक निवडणूक धोरणामुळे कमीत कमी वेळा आचार संहिता लागू करावी लागणार आहे असे ढवळीकर यांनी सांगितले.

Web Title: Maharashtrawadi Party supports NDA's One Country One Election proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.