गोव्यात मूळ महाराष्ट्रातील एकाला गांजा प्रकरणात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:57 PM2019-06-27T21:57:18+5:302019-06-27T21:57:21+5:30
मडगाव: गोव्यात मडगावात गांजा प्रकरणात मूळ महाराष्ट्रातील एकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून वीस हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला ...
मडगाव: गोव्यात मडगावात गांजा प्रकरणात मूळ महाराष्ट्रातील एकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून वीस हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. राजगिरी महान्ता (65) असे संशयिताचे नाव आहे.तो मूळ महाराष्ट्रात राज्यातील परभरणी येथील आहे. आठ दिवसांमागे तो रेल्वेमार्गे गोव्यात आला होता.
मडगावच्या अग्निशामक दल कार्यालयानजिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे बावीस ग्राम गांजा सापडला मागाहून त्याला रितसर अटक करण्यात आली. चालू वर्षातील गांजा प्रकरणातील मडगाव पोलिसांनी आतापर्यंत एकूण दहा प्रकरणो नोंद केली आहे. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याखाली महान्ता याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर धाटकर पुढील तपास करीत आहे.