'प्रशासन तुमच्या दारी' यशस्वी करा; मुख्यमंत्र्यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:09 AM2023-03-16T11:09:58+5:302023-03-16T11:10:29+5:30

सरकारला १८ रोजी चार वर्षे पूर्ण होत असल्याने विशेष उपक्रम

make administration at your door a success chief minister appeal to bjp workers | 'प्रशासन तुमच्या दारी' यशस्वी करा; मुख्यमंत्र्यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

'प्रशासन तुमच्या दारी' यशस्वी करा; मुख्यमंत्र्यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: सावंत सरकारला येत्या १८ रोजी चार वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजित 'प्रशासन तुमच्या दारी' या विशेष उपक्रमात भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे व हा उपक्रम यशस्वी करावा, यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पक्षाच्या २५० ते ३०० कार्यकर्त्यांना व्हर्च्यूअल पद्धतीने संबोधले.

१७ रोजी मुख्यमंत्र्यांसह सर्व १२ मंत्री वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये लोकांची गाणी ऐकतील. उपजिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार असून, मंत्र्यांबरोबर प्रशासनात सचिव असलेले आयएएस अधिकारीही उपस्थित राहतील.

१८ रोजी सरकारचे स्वयंपूर्ण मित्र, प्रशासनातील अधिकारी आणि आयएएस अधिकारी सर्व ग्रामपंचायती आणि पालिकांना भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरकारने तसेच सत्ताधारी पक्षानेही कंबर कसली आहे. संबंधित मतदारसंघांमधील आमदारांनाही या उपक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

दरम्यान, या उपक्रमाच्या माध्यमातून सरकार पुन्हा लोकांच्या दारापर्यंत जाणार आहे. तसेच विविध प्रशासकीय अधिकारी या मोहिमेत सहभागी होणार असल्यामुळे लोकांच्या समस्यांचा जाग्यावरच निपटारा करण्याचा सरकारचा मनोदय आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मंत्र्यांवर जबाबदारी

मुख्यमंत्री स्वतः केपे मतदारसंघात जातील. १७ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हा उपक्रम होणार आहे. सांगेत विश्वजीत राणे, सत्तरीत माविन गुदिन्हो, तिसवाडीत रवी नाईक, काणकोणात नीलेश काब्राल, पेडणेत सुभाष शिरोडकर, सासष्टीत रोहन खंवटे, मुरगावमध्ये गोविंद गावडे, फोंड्यात बाबूश मोन्सेरात, बार्देशमध्ये सुदिन ढवळीकर, धारबांदोड्यात नीळकंठ हळर्णकर व डिचोलीत सुभाष फळदेसाई लोकांची गाहाणी ऐकतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: make administration at your door a success chief minister appeal to bjp workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.