केंद्र सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवा: विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:38 AM2023-12-27T10:38:16+5:302023-12-27T10:39:13+5:30
वाळपई पालिकेतर्फे विकसित भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत.
गुळेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरु झालेल्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न केले पाहिजे, लोकांच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांचा नगरपालिकेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे उद्गार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काढले.
विकसित भारत संकल्प यात्रा वाहनाचे बाळपई नगरपालिकेतर्फे स्वागत केले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, इतर नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थित नागरिकांना करून देण्यात आली, यात पालिकेचा मोलाचा वाटा आहे, असेही मंत्री राणे पुढे म्हणाले.
वाळपई शहीद स्तंभाकडून विकसित भारत संकल्प यात्रा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. शहिद स्तंभाकडून नगरपालिका कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान वाळपईच्या नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, फैजल शेख, सेहजीन शेख, अनिल काटकर, विनोद शिंदे तसेच इतरांची उपस्थिती होती. पालिका सीईओ दशरथ गावस यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याबाबतची शपथ सर्वांना दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
मोदींच्या नेतृत्वाखाली प्रगतीचा मार्ग खुला
आरोग्यमंत्री राणे म्हणाले, वाळपईमध्ये केंद्राच्या विविध योजनांमुळे प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अटल समर्पणाने, आम्ही विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेच्या समर्थनार्थ एकजुटीने उभे आहोत. त्यांचे नेतृत्व आपल्या देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेईल, याची खात्री बाळगू, आम्ही २०२४ मध्ये त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत, असे मंत्री राणे म्हणाले.