आमचाही पगार ५० हजार रुपये करा; ५० ट्रक चालकांनी एकत्र जमून केली महत्त्वाची मागणी
By पूजा प्रभूगावकर | Updated: January 17, 2024 13:09 IST2024-01-17T13:09:13+5:302024-01-17T13:09:56+5:30
हिट ॲण्ड रन प्रकरणातील तरतुदींचा वाद अद्याप संपेनात

आमचाही पगार ५० हजार रुपये करा; ५० ट्रक चालकांनी एकत्र जमून केली महत्त्वाची मागणी
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी गोवा:हिट ॲण्ड रन प्रकरणात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ७ लाखांची नुकसानभरपाई दाेषी ट्रक चालकांनी द्यावी असा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. या स्थितीत ट्रक चालकांचा किमान पगार ५० हजार रुपये करावा, अशी मागणी ट्रक चालकांनी केली आहे.
ताळगाव येथे सुमारे ५० ट्रक चालकांनी एकत्र जमून ही मागणी केली. सध्या ट्रक चालकांना १५ ते २० हजार रुपये पगार मिळतो. या पगारात आम्ही समाधानी आहे. मात्र केंद्र सरकारने जो नवा कायदा आणला आहे, त्यानुसार जी रक्कम नुकसानभरपाई म्हणून नमूद केली आहे, ती देणे ट्रक चालकांना शक्य नाही. आमचा या कायद्याला विरोध नाही. मात्र ट्रक चालकांचा सुध्दा सरकारने विचार करावा.अनेकदा ट्रकची चुकी नसते. समोरच्या वाहनाची सुध्दा चुकी असते. मात्र दोष ट्रक चालकालाच दिला जातो अशी टीका त्यांनी केली.