गोव्याच्या बाजारात कैऱ्या दाखल, शंभर रुपयांना पाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 05:17 PM2023-12-17T17:17:07+5:302023-12-17T17:17:24+5:30

यंदाच्या हंगामातील या पहिल्या कैऱ्या आहेत.

mango entered the market of Goa, five for one hundred rupees | गोव्याच्या बाजारात कैऱ्या दाखल, शंभर रुपयांना पाच

गोव्याच्या बाजारात कैऱ्या दाखल, शंभर रुपयांना पाच

शिवोली : गोमंतकीय भूमीत उत्पादीत केलेल्या कैऱ्या सर्वप्रथम बाजारात आणण्याचा विक्रम यंदाही समीर धारगळकर यांनी साकारला आहे. ओशेल - शिवोली येथील आंबा व्यवसायिक समीर धारगळकर यांनी शनिवारी बाजारात कैऱ्यांची विक्री केली. शंभर रुपयांना पाच कैऱ्या असा दर होता. 

धारगळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कैऱ्याचे उत्पादन गोव्यातच झाले आहे. यंदाच्या हंगामातील या पहिल्या कैऱ्या आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वप्रथम कैऱ्या बाजारात घेऊन येण्याची कमाल धारगळकर यांनी केली होता. यंदा थोडा उशीर झाला असे ते म्हणाले. खास करून लोणचे तयार करण्यासाठी या कैऱ्यांचा वापर केला जातो. आत डिसेंबर महिन्याच्या मध्यावर कैऱ्या बाजारात आल्या आहेत. येत्या काही दिवसातच आंबाही बाजारात येईल अशी माहिती समीर धारगळकर यांनी दिली. 

Web Title: mango entered the market of Goa, five for one hundred rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा