मनोहर विमानतळ अजूनही 'न्यू गोवा'च; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाकडे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:26 AM2023-03-12T11:26:41+5:302023-03-12T11:27:17+5:30

फलक अद्याप 'जैसे थे'

manohar airport still new goa ignoring the decision of the union cabinet meeting | मनोहर विमानतळ अजूनही 'न्यू गोवा'च; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाकडे दुर्लक्ष 

मनोहर विमानतळ अजूनही 'न्यू गोवा'च; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाकडे दुर्लक्ष 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' या नावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटनावेळी केली. त्यानंतर बुधवार, दि. ४ जानेवारी २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला अधिकृतरीत्या मान्यता दिली होती. मात्र, जीएमआर कंपनीकडून न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट नावाचे फलक अजूनही तसेच लावलेले आहेत. त्यामुळे पर्रीकर प्रेमी व पेडणेवासीयांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री, गोवा राज्य प्राधिकरण मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्याकडे याप्रकरणी स्थानिक पत्रकार ज्ञानेश्वर वरक यांनी ईमेल द्वारे तक्रार केली आहे. वरक यांनी या तक्रारीत नमूद केले की, विमानतळाच्या बांधकाम करणाऱ्या जीएमआर कंपनीने सरकारसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे.

करारामधील नियम व अटी क्रमांक ५ प्रमाणे विमानतळ किंवा त्याच्या कोणत्याही भागाला जीएमआर किंवा त्याच्या भागधारकांचे नाव किंवा ओळख जाहिरात करण्यासाठी कोणत्याही प्रकारे ब्रॅण्डिंग केले जाणार नाही. स्वतःच्या नावाचा प्रचार करण्यासाठी विमानतळाचा वापर केला जाणारा नसल्याचे करारात नमूद केले आहे. परंतु करारात नमूद केलेल्या या अटींचे उल्लंघन केले जात आहे.

ज्ञानेश्वर वरक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. दि. २४ फेब्रुवारी रोजी ही ई-मेल वरक यांनी पाठविला होता. परंतु अद्यापपर्यंत त्याची एकाही संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे वरक यांनी खंत व्यक्त केली आहे. विमानतळ बांधकाम कंपनीने महामार्गालगत ठिकठिकाणी फलक लावले आहेत. त्यावर अद्याप नावात बदल केला नाही.

सरकारकडून दुर्लक्ष का?

- एका खासगी कंपनीकडून सरकारसोबत केलेला कराराचे उल्लंघन होत आहे. एक जागरूक नागरिक आणि पत्रकार या नात्याने सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम आपण केले आहे. परंतु सरकार- कडून याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याची खंत वरक यांनी व्यक्त केली.

- भाजप सरकारने आणि माजी केंद्रीयमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा मान राखण्यासाठी जीएमआर कंपनीला धाक दाखवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या आदेशाचे पालन न केल्याने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असल्याचे वरक यांनी सांगितले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: manohar airport still new goa ignoring the decision of the union cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.