मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 04:04 PM2018-10-14T16:04:04+5:302018-10-14T16:04:23+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दुपारी डिस्चार्ज मिळाला असून, ते एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात दाखल झाले आहेत.
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दुपारी डिस्चार्ज मिळाला असून, ते एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात दाखल झाले आहेत. एम्समधून हलवल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून गोव्यात आणल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं दिले आहे. त्या फोटोंमधून मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळतंय.
स्वादुपिंडाच्या गंभीर आजारामुळे त्यांना 15 सप्टेंबर रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले 28 दिवस त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. दाबोळी विमानतळावरून पर्रीकर यांना थेट त्यांच्या दोनापॉल येथील घरी नेण्यात आले. तेथे रुग्णवाहिका, औषधांची सामुग्री असलेली व्हॅन सज्ज आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर व डॉक्टरांचे पथक तेथे आहे.
Goa CM Manohar Parrikar has been brought to Panaji, Goa today. Earlier visuals of the CM being brought outside AIIMS (All India Institutes of Medical Sciences) Delhi. pic.twitter.com/Y39ugip5lS
— ANI (@ANI) October 14, 2018