मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

By admin | Published: March 14, 2017 05:36 PM2017-03-14T17:36:22+5:302017-03-14T18:00:34+5:30

गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे.

Manohar Parrikar is the Chief Minister of Goa | मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

Next

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे. पर्रीकरांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पर्रीकरांसोबत आणखी 13 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मनोहर पर्रीकर हे चौथ्यांदा गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. मनोहर पर्रीकरांसोबत भाजपाच्या फ्रान्सिस डिसुजा, पांडुरंग मडकेकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर, मनोहर त्रिंबक आजगावकर, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई, विनोद पालेकर, अपक्ष गोविंद गावडे, रोहन खवंटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पर्रीकरांना आणखी दोन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. चर्चिल आलेमाव आणि प्रसाद गावकर मनोहर पर्रीकरांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता पर्रीकरांकडे एकूण 23 आमदारांचा पाठिंबा आहे.
गोव्यात भाजपाच्या सत्ता स्थापनेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र काँग्रेसची याचिका फेटाळत गोवा विधानसभेत भाजपाला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मनोहर पर्रिकर यांचा सत्ता स्थापनेचा दावा फेटाळून लावण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारून सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला धारेवर धरले होते.

(गोव्यात मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा)
('या' चुकीमुळे गोव्यात काँग्रेस बसणार विरोधी बाकांवर)
मात्र या शपथविधी सोहळ्यादरम्यान काँग्रेसचे 17 आमदार दिग्विजय सिंह यांच्यासोबत राजभवनात हजर झाले असून, त्यांनी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्यानं आम्हाला पहिलं सरकार बनवण्याचं आमंत्रण दिलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतांसाठी 21 सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपाचे 13 आमदार निवडून आले. काँग्रेसचे संख्याबळ 17 आहे. असे असतानाही भाजपाने छोटया पक्षांना आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. भाजपाप्रणीत आघाडीकडे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष तीन मिळून एकूण 23 आमदारांचे संख्याबळ आहे.

Web Title: Manohar Parrikar is the Chief Minister of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.