कोणाकडेही सोपवणार नाही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार, अमेरिकेहून काम करणार- पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 09:11 PM2018-08-30T21:11:38+5:302018-08-30T21:11:56+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत.

manohar parrikar denied to handover cm charge to anyone | कोणाकडेही सोपवणार नाही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार, अमेरिकेहून काम करणार- पर्रीकर

कोणाकडेही सोपवणार नाही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार, अमेरिकेहून काम करणार- पर्रीकर

Next

पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. पर्रीकर अमेरिकेला गेल्यामुळे गोव्यात सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. त्यातच मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार कोणाकडेही सोपवलेलं नाही. तसेच मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता चार्ज कोणाकडेही देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पर्रीकर म्हणाले, गोव्यासंदर्भातील प्रशासकीय कामं मी अमेरिकेतून करणार आहे. मी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार कोणाकडेही सोपवणार नाही. महत्त्वाची कामं मी अमेरिकेतून करणार असून, माझ्या कर्मचा-याच्या मी ईमेलच्या माध्यमातून संपर्कात आहे. गोवा सरकारमधील सगळेच मंत्री सध्या अस्वस्थ आहेत. राजकीय स्थिती अस्थिरतेची बनू लागली आहे. अगोदरच सरकारमधील दोन मंत्री इस्पितळात आहेत. ते कधी बरे होऊन परत येतील हे कुणाला ठाऊक नाही. त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सुद्धा आजारी आहेत. ते न्यूयॉर्क अमेरिकेमधील स्लोन केटरींग स्मृती इस्पितळातून दुस-यांदा उपचार घेऊन नुकतेच परतले होते. मात्र, त्यांना पुन्हा मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल व्हावे लागले. आता मुंबईहून ते पुन्हा अमेरिकेला उपचारांसाठी निघाले.
गोव्यात राजकीय गोंधळ; सरकारमध्ये पर्यायी नेतृत्वाची चर्चा, पर्रीकर पुन्हा अमेरिकेला
गोव्यात मुख्यमंत्री बदलला तर सरकार पडणार?
मुख्यमंत्री अमेरिकेहून परत कधी येतील याची कुणालाच खरी कल्पना नाही. ते आठवड्यानंतर येतील असे सांगून फक्त भाजपा कार्यकर्त्यांची समजूत काढली जात आहे. गोवा सरकारमधील मंत्री यामुळे सैरभैर झाले आहेत. विद्यमान सरकारमध्ये भाजपाकडे फक्त 14 आमदार असून त्यापैकी तिघे गंभीर आजारी आहेत. गोवा फॉरवर्ड, मगोप आणि तिघे अपक्ष यांच्याच आधारावर विद्यमान सरकार टिकून आहे. मुख्यमंत्री वारंवार आजारी होऊ लागल्याने व त्यांचे अनेक दिवस इस्पितळांमध्ये उपचारांसाठीच जाऊ लागल्याने गोव्यातील भाजपही चिंताग्रस्त बनला आहे.

Web Title: manohar parrikar denied to handover cm charge to anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.