मनोहर पर्रीकर यांना एम्समधून डिस्चार्ज, दुपारी एअर अॅम्बुलन्सने गोव्यात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 01:44 PM2018-10-14T13:44:58+5:302018-10-14T13:45:14+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीतील एम्स इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असून दुपारी एअर अॅम्बुलन्सने त्यांना गोव्यात आणले जाईल.
पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीतील एम्स इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असून दुपारी एअर अॅम्बुलन्सने त्यांना गोव्यात आणले जाईल.
प्राप्त माहितीनुसार एम्स इस्पितळात सकाळी त्यांची प्रकृती काहीशी ढासळल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले परंतु नंतर आयसुयूमधून बाहेर आणून डिस्चार्ज देण्यात आला. स्ट्रेचरवरुनच त्यांना बाहेर आणण्यात आले. स्वादुपिंडाला जडलेल्या गंभीर आजारामुळे त्यांना १५ सप्टेंबर रोजी त्यांना एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले २८ दिवस ते या इस्पितळात होते. त्याआधी दोनवेळा अमेरिकेतही त्यानी उपचार घेतलेले आहेत. दुपारी ३ च्या सुमारास पर्रीकर गोव्यात पोचतील, असे सूत्रांनी सांगितले.
दाबोळी विमानतळावरुन पर्रीकर यांना थेट त्यांच्या दोनापॉल येथील घरी आणण्यात येणार आहे. तेथे रुग्णवाहिका, औषधांची सामुग्री असलेली व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. शिवानंद बांदेकर व डॉक्टरांचे पथक तेथे आहे.