मनोहर पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेस रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:17 AM2018-03-07T04:17:34+5:302018-03-07T04:17:34+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी रात्री उशिरा उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती गोवा सरकारने दिली.
पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी रात्री उशिरा उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती गोवा सरकारने दिली. ते दीड ते दोन महिने अमेरिकेत उपचार घेतील, असे सुत्रांनी सांगितले. पर्रीकरांना अमेरिकेत कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, हे स्पष्ट
करण्यात आलेले नाही. तथापि, ते न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोअन केट्टरींग कॅन्सर रिसर्च फाऊंडेशनमध्ये उपचार घेतील, असे सुत्रांनी
सांगितले. आपण अमेरिकेत उपचारांसाठी जाऊ शकतो अशी कल्पना पर्रीकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना सोमवारी लिहिलेल्या पत्रातून दिली आहे. पर्रीकरांना स्वादूपिंडाशी निगडीत आजार आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी आधी आठवडाभर
उपचार घेतले. पर्रीकरांचे मोठे पुत्र उत्पल हेही अमेरिकेला गेले आहेत. अर्थसंकल्पीय भाषण करण्यासाठी पर्रीकर लिलावती रुग्णालयातून गोव्यात आले होते.
Goa Chief Minister Manohar Parrikar at the Chhatrapati Shivaji International Airport, Mumbai. As advised by doctors at Lilavati Hospital, Parrikar is leaving for USA for further treatment. pic.twitter.com/964j0HMkyW
— ANI (@ANI) March 6, 2018