मनोहर पर्रीकर पणजीतूनच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 02:51 AM2017-05-11T02:51:33+5:302017-05-11T02:51:33+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जागा रिकामी करून देण्यासाठी बुधवारी सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

Manohar Parrikar will fight from Panaji only | मनोहर पर्रीकर पणजीतूनच लढणार

मनोहर पर्रीकर पणजीतूनच लढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जागा रिकामी करून देण्यासाठी बुधवारी सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे पर्रीकर पणजी मतदारसंघातूनच पोटनिवडणूक लढवतील हे आता स्पष्ट झाले.
पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्रिपदी गेले, तेव्हा पणजीतून पोटनिवडणुकीत सिद्धार्थ कुंकळयेकर निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी बाबूश मोन्सेरात यांचा पराभव करून पुन्हा विजय संपादन केला. केंद्रातून गोव्यात परतलेले पर्रीकर यांनी गेल्या १४ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते कोणत्याही मतदारसंघाचे आमदार नव्हते. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत निवडून यावे लागेल.
४0 सदस्यीय विधानसभेत २ जागा रिकाम्या झाल्या असून ३८ आमदार आहेत. विश्वजीत राणे यांनी वाळपईतून राजीनामा दिल्याने तेथे पोटनिवडणूक होणार आहे.

Web Title: Manohar Parrikar will fight from Panaji only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.