उत्तर भारतीय पर्यटकांबाबतच्या मंत्री सरदेसार्इंच्या विधानाचे पडसाद, मनोहरलाल खट्टर यांनी पर्रिकरांकडे व्यक्त केली नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 06:28 PM2018-02-11T18:28:49+5:302018-02-11T18:30:52+5:30

उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेले उद्गार तसेच हरयानातील पायाभूत सुविधांवर केलेल्या टिकेची गंभीर दखल घेत हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना फोन करुन तीव्र नाराजी व्यक्त केली.

Manoharlal Khattar expresses regret for the statement of North Indian tourist minister Sardesai | उत्तर भारतीय पर्यटकांबाबतच्या मंत्री सरदेसार्इंच्या विधानाचे पडसाद, मनोहरलाल खट्टर यांनी पर्रिकरांकडे व्यक्त केली नाराजी 

उत्तर भारतीय पर्यटकांबाबतच्या मंत्री सरदेसार्इंच्या विधानाचे पडसाद, मनोहरलाल खट्टर यांनी पर्रिकरांकडे व्यक्त केली नाराजी 

Next

पणजी - उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेले उद्गार तसेच हरयानातील पायाभूत सुविधांवर केलेल्या टिकेची गंभीर दखल घेत हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना फोन करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. हरयानातही भाजपचे सरकार सत्तेवर आहे.  

मनोहरलाल खट्टर यांनी स्वत:च ही माहिती व्टीट करुन दिली आहे. ‘सरदेसाई यांच्या तोडात प्रसार माध्यमांनी चुकीची वाक्ये टाकली असावीत तसेच सरदेसाई यांना गुरगांवमधील पूर्वीच्या अनियोजित पायाभूत सुविधांचा संदर्भ द्यायचा असावा.’, असे पर्रीकर आपल्याशी बोलताना फोनवर बोलताना म्हणाल्याचेही खट्टर यांनी व्टीट केले आहे. 

मिरामार-दोनापॉल मार्गावर एक पर्यटक बसमधून लघुशंका करतानाचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांकडूनच असे प्रकार अधिक घडतात. हे पर्यटक म्हणजे पृथ्वीतलावरचा मळ आहे, असे म्हटले होते. गोव्यात गैर वागणाºया उत्तर भारतीयांना गोव्याचे हरयाना बनवायचे आहे काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला होता. याचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच खुद्द पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनीही असे गैर वागणाºया पर्यटकांना हाकलून लावू, असे सुनावले होते. गोव्यात येणाºया पर्यटकांनी येथील कायदे, कानून तसेच संस्कृतीचे पालन करायला हवे, असा दम त्यांनी भरला होता. याबाबतीत आपण कोणाचेही ऐकणार नाही आणि गैर वागणाºया पाहुण्यांच्या बाबतीत कडक पावले उचलणार असा इशारा दिला होता. 

दरम्यान, पर्यटक खात्याकडून उपलब्ध माहितीनुसार २0१६ साली ६३ लाख पर्यटकांनी राज्याला भेट दिली त्यात ५६ लाख भारतीय होते. २0१५ सालच्या तुलनेत ही वाढ १९.५0 टक्क्यांनी जास्त होती. दरवर्षी देशी पर्यटकांची संख्या येथे वाढतच चालली आहे. 

Web Title: Manoharlal Khattar expresses regret for the statement of North Indian tourist minister Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.