गोव्यातील ओएनजीसीत नोकरी देतो असे सांगून अनेकांची आर्थिक फसवणूक
By सूरज.नाईकपवार | Published: March 1, 2024 05:53 PM2024-03-01T17:53:59+5:302024-03-01T17:54:38+5:30
संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार.
मडगाव: गोव्यातील बेतुल येथील ओएनजीसी मध्ये नोकरी मिळवून देतो अशी वर्तमानपत्रातून जाहिरात करुन अनेकांना गंडा घालण्याची घटना उघडकीस आली आहे. फसविली गेलेली एक युवती मॅक्लिन डायस हिने काल पोलिसांत तक्रारही केली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक कार्यालयात तिने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत संदीप कुमार या संशयिताचे नाव घेण्यात आले आहे. तसेच त्याचा संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आला आहे. काँग्रेसचे सावियो कुतिन्हो हेही होते. संशयितावर कारवाई करावी अशी मागणी कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना केली. असले प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
ओएनजीसीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटवर अन्य नोकरीचे आमिष संशयित दाखवित होता. तक्रारदार युवती डायस हिला डेटा एन्ट्री ऑपरेटर नोकरी देतो असे सांगून पैसे घेण्यात आले. नोकरीचे लेटर व पगाराचे पत्रही ऑनलाईनपध्दतीने पाठवून देण्यात आले. मात्र नंतर आपण फसविले गेले हे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात तक्रार केली.