फोमेन्तोला दर दिवशी एक लाख रुपये फेडण्यास नगरसेवकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 06:33 PM2019-09-05T18:33:44+5:302019-09-05T18:36:13+5:30
मडगाव पालिका व फोमेन्तो ग्रीन यांच्यात सध्या पैसे फेडण्यावरुन वाद चालू असून यासंबंधी न्यायालयात प्रकरण चालू आहे.
मडगाव: फोमेन्तो ग्रीन कंपनीला दर दिवशी अवघ्या 30 ते 35 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक लाख रुपये फेडण्याच्या मडगाव पालिकेच्या निर्णयाला गुरुवारी मडगाव पालिकेच्या झालेल्या खास बैठकीत नगरसेवकांकडूनच विरोध करण्यात आला. त्याचरप्रमाणे रक्कम ठरविताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विचार का केला नाही असा सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी या बैठकीत विचारला.
मडगाव पालिका व फोमेन्तो ग्रीन यांच्यात सध्या पैसे फेडण्यावरुन वाद चालू असून यासंबंधी न्यायालयात प्रकरण चालू आहे. मागच्या सुनावणीच्यावेळी 30 सप्टेंबर्पयत कच:यावर प्रक्रिया करण्यासाठी फोमेन्तो कंपनीला दररोज एक लाख रुपये फेडण्याचे पालिकेने मान्य केले होते. त्यासंदर्भात गुरुवारी बैठक झाली असता ही एवढी मोठी रक्कम कोणत्या आधारावर ठरवली गेली असा सवाल भाजपाचे नगरसेवक केतन कुरतरकर यांनी केला.
यावेळी नगरसेवक रुपेश महात्मे यांनी न्यायालयाने जी कचरा प्रक्रियासंदर्भात जी तरतूद केली आहे ती केवळ 30 सप्टेंबर्पयतची असून 30 सप्टेंबरनंतर मडगाव पालिका कचरा प्रक्रियेचे काम फोमेन्तोकडूनच करुन घेणार की घनकचरा व्यवस्थापन महामंडळाद्वारे करणार असा सवाल केला असता, प्रभारी नगराध्यक्ष टीटो कादरेज यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चाधिकार समितीची लवकरात लवकर बैठक बोलावण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील असे सांगितले.
दरम्यान, 30 सप्टेंबरनंतर कचरा प्रक्रियेचे काम फोमेन्तोकडूनच करुन घ्यायचे असल्यास त्यांना दररोज एक लाख देण्याऐवजी 25 हजार रुपये देण्यासंदर्भात वाटाघाटी कराव्यात असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र 30 सप्टेंबर्पयत न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणोच पालिका वागेल असा खुलासा मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी केला.
फोमेन्तोकडून 22 लाखांचे बिल
10 ते 31 ऑगस्ट या कालावधीत फोमेन्तो ग्रीन कंपनीकडून मडगावच्या कच:यावर जी प्रक्रिया केली गेली त्याचे 22 लाखांचे बिल फोमेन्तोने मडगाव पालिकेला पाठविले आहे. मात्र या खर्चाची तपशीलवार माहिती द्या असे उलटपत्री मडगाव पालिकेने फोमेन्तोला कळविले असल्याचे मुख्याधिकारी नाईक यांनी सांगितले. या प्रक्रियेसाठी वीजेचा खर्च किती आला, कामगारावर किती खर्च केला, अन्य खर्च काय आहे या सर्वाचा तपशील पालिकेने मागितला असल्याचे नाईक यांनी सांगितले. दरम्यान, फोमेन्तोच्या प्रकल्पावर जो कचरा पाठविला जातो त्याचे वर्गीकरण मडगाव पालिकेचे कर्मचारी करतात. यासाठी मडगाव पालिकेचीच वाहने वापरली जातात असे असतानाही दिवसाला एक लाख रुपये खर्च कसा येतो याबद्दल नगरसेवकांनी आश्र्चर्य व्यक्त केले. सोनसडय़ाला आग लागल्यानंतर फोमेन्तोचा हा प्रकल्प खराच चालतो की नाही हे मुख्याधिका:यांनी प्रक़ल्पाला भेट देऊन तपासणी करावी अशी मागणीही काही नगरसेवकांनी केली.