सेंट फ्रान्सिस ङोवियर्सच्या नोव्हेनात मराठी, हिंदीतूनही मासेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 05:32 PM2019-11-23T17:32:55+5:302019-11-23T17:33:20+5:30
कोंकणीसह एकूण दहा भाषांतून मासेस; इटालियन, फ्रेंच व स्पॅनिश भाषेचाही समावेश
मडगाव: जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेंट फ्रान्सिस ङोवियर्सच्या फिस्टची नोव्हेना आज रविवारपासून सुरु होणार असून फक्त कोंकणी व इंग्लीशमधूनच नव्हे तर मराठी, कन्नड, हिंदी यासह एकूण दहा भाषात या फेस्तानिमित्त मासेस होणार आहेत.
दरवर्षी 3 डिसेंबरला होणा:या या फेस्ताच्या आधी 9 दिवस नोव्हेना होणार असून या 9 दिवसात ओल्ड गोवाच्या बॉ जिझस बासिलिकामध्ये इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच व पोतरुगीज अशा विदेशी भाषात तर कन्नड, तेलगू, तमिळ, मराठी, हिंदी, मल्याळम तसेच कोंकणीतून मासेस होणार आहेत. दररोज सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 5.15 र्पयत होणारे मासीस कोंकणीतून होणार असून सायंकाळी 6.15 वाजता होणारे मास इंग्रजीतून होणार आहे.
या बासिलिकाचे रेक्टर फा. पेट्रीसियो फर्नाडिस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, विदेशी भाषांतील मासेस त्या त्या भाषेत पारंगत असलेल्या गोव्यातील धर्मगुरुकडून सादर केली जाणार आहेत. इटालियन भाषेतून होणारे मास सात आठ वर्षे इटलीत वास्तव करुन नंतर भारतात परतलेले बंगळुरुचे फा. मायकल पिटर्स सादर करणार असून 30 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वा. हे मास होणार आहे. त्यात गोव्यात वास्तव करुन रहाणा:या इटालियन्सचा समावेश असेल.
अलायन्स फ्रान्सेजमध्ये शिकविणारे गोव्यातील धर्मगुरु फा. वरुण रॉड्रीगीस हे फ्रेंचमधून मास सादर करणार असून 26 नोव्हेंबरला 2.30 वा. हे मास होणार आहे. यावेळी म्हापशातील सेंट ङोवियर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक इलेन डिकॉस्ता यांचे कॉयर असेल.
स्पॅनिश भाषेतील मास फेस्ताच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. होणार असून फा. अनिल परेरा हे ते सादर करणार आहेत. त्याशिवाय 1 डिसेंबरला सकाळी 11.30 वा. पोतरुगीज भाषेतूनही मास होणार आहे. या विविध भाषेतून होणा:या प्रार्थना व प्रवचने ऐकण्यासाठी विविध भाषीक चर्चमध्ये येणार असून त्यात स्थानिकांचाही समावेश असेल असे फा. फर्नाडिस यांनी सांगितले. काही भाविक कुतूहलापोटी या विदेशी भाषेतील मास ऐकण्यासाठीही येतात असे त्यांनी सांगितले.
कोंकणी व्यतिरिक्त अन्य 6 देशी भाषांतून मासेस होणार असून 24 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वा. तमिळ, 12.30 वा. मल्याळम तर दुपारी 2.30 वा. हिंदीतून मास होणार आहे. 30 नोव्हेंबरला दुपारी 12.30 वा. तेलगू भाषेतून, 1 डिसेंबरला दुपारी 12.30 मराठी भाषेतून तर 2 डिसेंबरला सकाळी 11.30 वा. कन्नड भाषेतून मास सादर केले जाणार आहे.
या फेस्तासाठी बेळगाव, कारवार तसेच कर्नाटक व महाराष्ट्राच्या भागातील कित्येक भाविक पायी चालत प्रवास करत गोव्यात येत असतात. त्यांच्या सोयीसाठी अन्य देशी भाषांतून मासचे आयोजन करण्यात येत आहे. या भविकांना विश्रंती घेण्यासाठी तसेच प्रार्थना सादर करण्यासाठी विशेष मंटप उभारण्यात येणार असल्याचीही माहिती फा. फर्नाडिस यांनी दिली.