मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे २१ ते २७ रोजी आध्यात्मिक हीलिंग कार्यशाळेचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 06:16 PM2023-08-18T18:16:37+5:302023-08-18T18:17:57+5:30

नारायण गावस, पणजी ( गोवा ): मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा आणि वर्धा, महाराष्ट्र येथील त्रिवेणी चैतन्यम् ट्रस्ट यांच्या संयुक्त ...

Matrubhumi Seva Foundation organized spiritual healing workshop on 21st to 27th | मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे २१ ते २७ रोजी आध्यात्मिक हीलिंग कार्यशाळेचे आयोजन

मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे २१ ते २७ रोजी आध्यात्मिक हीलिंग कार्यशाळेचे आयोजन

googlenewsNext

नारायण गावस, पणजी (गोवा): मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा आणि वर्धा, महाराष्ट्र येथील त्रिवेणी चैतन्यम् ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत रोग मुक्त दवा मुक्त-आध्यात्मिक हिलिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

कदंब पठार, रायबंदर येथील साई प्रार्थना मंदिर ट्रस्ट येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. सतीश सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्य़शाळेत मधुमेह, अस्थमा, रक्तदाभ, ह्रदय रोग, गुडघेदुखी, श्वास आणि पचन संबंधी विकार, मूळव्याध, अनिद्रा, संधी विकार, कमजोर स्मरणशक्ती, थायरॉईड, मानसिक तणाव, भय, एलर्जी आदि समस्यांवर उपचार करण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेला गोवा पर्यटन महामंडळाच्या सहयोगाने होणार असलेल्या या कार्यशाळेच्या अगोदर म्हणजे १९ व २० ऑगस्ट रोजी सायं. ६ ते रात्री ८ यादरम्यान ओळख कार्यशाळेचे आयोजन केलेले असून हे दोन दिवस कार्यशाळेबद्दल तपशीलवार माहिती देण्यात येईल. कार्यशाळेसाठी नोंदणी करणाऱ्यांना २१ ते २७ ऑगस्टपर्यंत सायंकाळी रोज ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत होणाऱ्या कार्यशाळेला सर्व ७ ही दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९८२२८१७८८३/ ०८३२ – २४३८५०१ / या क्रमांकावर संपर्क साधावा.

डॉ. सतीश सावरकर

डॉ. सतीश सावरकर हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते असून ते एक प्रसिद्ध सामूहिक हीलर, मनोतज्ज्ञ, डेल्टा हीलर आहेत. `सायकोन्यूरोबिक्स` या विषयावर त्यांनी डॉक्टरेट संपादन केलेली आहे. ते इंडियन ट्रेनर असोसिएशनचे सदस्यही आहेत.
त्रिवेणी हीलिंग उपचार ही डॉक्टर सतीश सावरकर यांच्या वर्धा, महाराष्ट्र स्थित त्रिवेणी चैतन्यम् ट्रस्टतर्फे राबविण्यात येणारी एक चळवळ असून आतापर्यंत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड, कर्नाटक आदि विविध राज्यांत यासंबंधी परिषदा, कार्यशाळा आणि निवासी हीलिंग शिबिरांचे ट्रस्टतर्फे यशस्वी आयोजन केलेले आहे.

मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे कार्य

मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा ही समाजकल्याण विषयक उपक्रम राबविणारी एक सेवाभावी संस्था असून आरोग्य क्षेत्रातील या संस्थेचे कार्य मोठे आहे. आतापर्यंत मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने विविध क्षेत्रांत शंबराहून अधिक शिबिंरांचे आयोजन केलेले आहे. यात स्व. राजीव दीक्षित यासारख्या आध्यात्मिक आणि आयुर्वेद क्षेत्रातील थोर व्यक्तींचे मार्गदर्शनपर लेक्चर्स, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रम, अमरनाथ यात्रेचे आयोजन आदि उपक्रमांचा समावेश आहे.

Web Title: Matrubhumi Seva Foundation organized spiritual healing workshop on 21st to 27th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा