माविन गुदिन्हो यांना वाहतूक खाते नाकारले
By Admin | Published: April 12, 2017 02:28 AM2017-04-12T02:28:47+5:302017-04-12T02:36:34+5:30
पणजी : बुधवारी मंत्री म्हणून शपथ घेणारे माविन गुदिन्हो यांनी आपल्याला वाहतूक खाते मिळायला हवे, असा आग्रह धरला होता; पण
पणजी : बुधवारी मंत्री म्हणून शपथ घेणारे माविन गुदिन्हो यांनी आपल्याला वाहतूक खाते मिळायला हवे, असा आग्रह धरला होता; पण हे खाते यापूर्वीच मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांना द्यायचे असे ठरलेले असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक खाते माविनना देण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली. माविन यांना पंचायत खाते दिले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माविन यांना बोलावून घेतले. खाती सोमवारी दिली जातील याची कल्पना त्यांनी माविनना दिली. आपल्याला वाहतूक खाते मिळायला हवे, अशी अपेक्षा माविन यांनी व्यक्त केली होती; पण ते देता येणार नाही, याची कल्पना माविनना नंतर आली. माविनना दुसऱ्या टप्प्यात उद्योग खाते दिले जाणार आहे. प्रथम पंचायत खाते दिले जाईल. विश्वजीत राणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेऊन स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांना आरोग्य खाते दिले जाणार आहे.
सर्वच मंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यातील खाती सोमवारी दिली जातील. मंत्री बाबू आजगावकर यांना क्रीडा खाते मिळणार आहे. विविध रवींद्र भवनांची चेअरमनपदे मिळविण्यासाठी सध्या भाजप व गोवा फॉरवर्ड या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शर्यत लागली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान, वाळपईचे माजी आमदार विश्वजीत राणे व दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो या दोघांचा मंत्री म्हणून बुधवारी शपथविधी होत आहे. या दोघांच्या समावेशानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या १२ होणार आहे. त्यानंतर आणखी विस्तार करता येणार नाही. (खास प्रतिनिधी)