महापौर, उपमहापौरांनी घेतला पणजीतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2024 03:51 PM2024-04-04T15:51:44+5:302024-04-04T15:52:43+5:30

पावसाळ्यापूर्वी ही पूरस्थितीचे जागा साफ करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

mayor and deputy mayor reviewed the pre monsoon work in panaji | महापौर, उपमहापौरांनी घेतला पणजीतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा 

महापौर, उपमहापौरांनी घेतला पणजीतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा 

नारायण गावस, पणजी: पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात तसेच उपमहापौर संजीव नाईक यांनी गुरुवारी पणजी शहरातील काही ठिकाणी पावसाळ्यात येत असलेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. अगोदरच स्मार्ट सिटीच्या कामाचा लोकांना मोठा फटका बसला आहे  त्यातच आता पावसाळी पुराची स्थिती उद्भवू नये यासाठी महापौरांनी जलस्त्राेत खात्याचे अभियंते  तसेच मनपाच्या अभियंत्यांना घेऊन पाहणी केली तसेच पावसाळ्यापूर्वी ही पूरस्थितीचे जागा साफ करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

पणजी पावसाळ्यात अनेकवेळा रस्ते पाण्याखाली  येत असतात. १८ जून रस्ता, दिवजा सर्कल, कांपाल परिसर तसेच सांतीनेज परिसर, मळा पणजी अशा अनेक भागात पावसाळ्यात पूर येतो. त्यामुळे याचा फटका लोकांना बसतो. अगोदरच स्मार्ट सिटीच्या नावाखाली लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटीची कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ही कामे जोरात सुरु आहे. तसेच आता गटार साफ करण्याची कामे सुरु हाेणार आहे त्यामुळे  पावसाळ्यात अडथळा होणार नाही. पण स्मार्ट सिटीच्या कामामुळे ही पावसाळी पूर्व कामे करताना अडथळा येत  आहे.

महापौर राेहित मोन्सेरात म्हणाले, सध्या पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने पावसाळी पूर्व कामे करताना अडथळा येत आहे. तरीही आम्ही अधिकाऱ्यांना  तसेच अभियंत्यांना घेऊन शहरात विविध भागाची पाहणी केली आहे. पणजी पूर येऊ नये यासाठी  पाहणी केली जात आहे. स्मार्ट  सिटीची कामे संपताच तसतशी तशी पावसाळी कामे केली जाणार आहे. लाेकांना यंदा पुराचा फटका बसणार नाही यासाठी  काळजी घेतली जाणार आहे.

Web Title: mayor and deputy mayor reviewed the pre monsoon work in panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा