पणजीसाठी महापौर निवड 14 किंवा 15 मार्चला, चार उमेदवार तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 10:36 PM2018-02-23T22:36:24+5:302018-02-23T22:36:24+5:30

पणजीसाठी महापौर निवड येत्या दि. 14 किंवा 15 मार्च रोजी होणार आहे. महापालिकेतील काही अधिका:यांनी तसे स्पष्ट संकेत काही नगरसेवकांना दिले आहेत. महापौरपद व उपमहापौरपद मिळविण्यासाठी महापालिकेतील दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Mayor selection for Panaji, on 14 or 15 March, prepares four candidates | पणजीसाठी महापौर निवड 14 किंवा 15 मार्चला, चार उमेदवार तयार

पणजीसाठी महापौर निवड 14 किंवा 15 मार्चला, चार उमेदवार तयार

Next

पणजी : पणजीसाठी महापौर निवड येत्या दि. 14 किंवा 15 मार्च रोजी होणार आहे. महापालिकेतील काही अधिका:यांनी तसे स्पष्ट संकेत काही नगरसेवकांना दिले आहेत. महापौरपद व उपमहापौरपद मिळविण्यासाठी महापालिकेतील दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापौरपदासाठी दोन गटांमध्ये मिळून एकूण चार उमेदवार सध्या तयार आहेत, अशी माहिती राजकीय सुत्रंकडून मिळाली.

गेल्यावर्षी महापौर आणि उपमहापौर निवड ही 15 मार्च रोजी झाली होती. त्यामुळे विद्यमान महापौर व उपमहापौरांची निवड येत्या 15 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. दि. 8 मार्चपासून प्रक्रिया सुरू होईल पण प्रत्यक्ष निवड ही 14 किंवा 15 मार्चला होणार हे जवळजवळ निश्चित होऊ लागले आहे. सध्या महापालिकेत बाबूश मोन्सेरात यांच्या गटातील नगरसेवकांची सत्ता आहे. मोन्सेरात गटाकडे 17 नगरसेवक आहेत तर भाजप समर्थक गटाकडे 13 नगरसेवक आहेत. महापालिकेची एकूण नगरसेवक संख्या ही 3क् आहे. मोन्सेरात यांची जर फुर्तादो गटाने साथ सोडली तर मोन्सेरात गटाचे संख्याबळ पंधरा होईल. तसे झाले तर महापालिकेतील नवे महापौर व उपमहापौर निवडीचे राजकारण रंगणार आहे. पणजी महापालिका कायद्यानुसार दर वर्षी महापौर व उपमहापौर नव्याने निवडावे लागतात.

सत्ताधारी नगरसेवकांनी मोन्सेरात यांच्याशी संपर्क साधला तेव्हा आपण महापौर निवडत नाही, तुम्ही पंधरा किंवा सतराही नगरसेवक अगोदर एकत्र बसा व महापौरपदासाठी तुमचा उमेदवार कोणता तो ठरवा, मग मी माझा निर्णय काय तो सांगतो असे मोन्सेरात यांनी उदय मडकईकर व अन्य नगरसेवकांना सांगितले. त्यानुसार येत्या दि. 1 मार्चनंतर सत्ताधारी नगरसेवक अगोदर आपल्यामधून महापौरपदासाठी उमेदवार निवडतील व मग ते नाव ते बाबूशला कळवणार आहेत. बाबूशच्या गटात महापौर पदासाठी इच्छुक असे तीन उमेदवार आहेत. भाजपच्या गटात एक उमेदवार आहे. उपमहापौर पदासाठी बाबूश गटाने अस्मिता केरकर यांचे नाव निश्चित केले आहे. दि. 14 मार्चर्पयत कोणकोणत्या घडामोडी घडतील व काय समीकरणो तयार होतील ते कुणीच सांगू शकत नाही. कारण सध्या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हेही गोव्यात आहेत व पणजी महापालिकेवर त्यांचेही लक्ष आहे.

Web Title: Mayor selection for Panaji, on 14 or 15 March, prepares four candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा