एमबीबीएस, बीडीएस उमेदवार संभ्रमात
By admin | Published: June 14, 2016 02:51 AM2016-06-14T02:51:13+5:302016-06-14T02:51:13+5:30
वासुदेव पागी ल्ल पणजी वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया (काउन्सिलिंग) अजून निश्चित झाली नसल्यामुळे या दोन्ही
वासुदेव पागी ल्ल पणजी
वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया (काउन्सिलिंग) अजून निश्चित झाली नसल्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पात्र उमेदवार संभ्रमात पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सरकारने घातलेला घोळ ताजा असल्यामुळे, केला जात असलेला विलंब मात्र उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढविणारा ठरत आहे.
एमबीबीएस आणि बीडीएससाठी पहिल्या फेरीतील काउन्सिलिंग जे १६ जूनला म्हणून जाहीर करण्यात आले होते, ते अचानक लांबणीवर टाकण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे, तर १६ जून ही जाहीर करण्यात आलेली तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, याची कबुली खुद्द तांत्रिक शिक्षण संचालनालयानेच दिली आहे. अनिश्चिततेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नीट व सीईटीसंदर्भात झालेल्या आदेशाचे विश्लेषण हे निमित्त सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या आदेशाचे अजून विश्लेषण होत नाही आणि काउन्सिलिंग ठरत नाही, हे कारण पटण्यासारखे नसल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.
एमबीबीएस व बीडीएसच्या प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला तर आयुर्वेदिक महाविद्यालये, होमियोपॅथिक महाविद्यालये, पॅरामेडिकल अभ्यासक्रम, परिचारिका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर टाकावी लागणार आहे. अन्यथा बीडीएस व एमबीबीएसला मुकलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची संधीही हुकणार आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश न मिळाल्यास अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचीही गोची होणार आहे.
सर्व काही व्यवस्थित सुरू असताना काउन्सिलिंग लांबणीवर टाकण्याचा प्रस्ताव नेमका कोठून आला आणि का आला, याबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे.
राजकीय दबावामुळे विद्यार्थ्यांना वेठीस
धरले जात असल्याचेही काही अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम बंगाल व इतर काही राज्यांत या अभ्यासक्रमासाठी तारखा निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्रात तर काउन्सिलिंगही झाले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करायला गोव्यालाच
का इतका उशीर लागतो, असे प्रश्न
उपस्थित केले जात आहेत.