एमबीबीएसचे ऑनलाइन लेक्चर सुरू, गोमेकॉची विद्यार्थ्यांसाठी खास व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:12 PM2020-04-18T21:12:45+5:302020-04-18T21:13:08+5:30
एमबीबीएसच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था आहे.
पणजीः गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तासिका सुरू करण्यात आल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे वर्ग घेण्यात येत आहेत.
याविषयी माहिती देताना गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले, 'वेबेक्सी या आयटी क्षेत्रातील कंपनीची मदत घेवून एक सिस्टम तयार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळे लॉगइन सुविधा देण्यात आली आहे. वेळापत्राकानुसार विद्यार्थ्यांना लॉगइन करता येईल आणि ऑनलाइन लेक्चरला हजेरी लावता येईल, अशी ही सुविधा आहे. ऑनलाइन लाईव्हही आहे आणि रेक़़ॉर्डिंगही आहे."
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ बांदेकर म्हणाले. एमबीबीएसच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था आहे. शनिवारी पहिले लेक्चर झाल्याची माहिती त्यांनी दिली.