सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 05:17 PM2023-11-10T17:17:01+5:302023-11-10T17:17:36+5:30

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

meaningful dialogue essential for strong democracy said vice president | सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

लोकमत न्यू वर्क पणजी: 'विविधतेतील एकता हे समाजाचे सार आहे. आज राष्ट्राची लोकशाही मजबूत करण्यासाठी अर्थपूर्ण आणि फलदायी संवाद, विचारविमर्श, चर्चा आणि वादविवाद होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या 'वामन वृक्ष कला' या २०० व्या पुस्तकाचे राजभवन येथील न्यू दरबार सभागृहात प्रकाशन केल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. 

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, माणसामध्ये सर्जनशीलता येतेच. पण ती टिकवून ठेवणे हे अवघड काम आहे. आपल्या प्राचीन वेदांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या सभ्यता, मूल्ये आणि शहाणपणाची आठवण करून देणारे महत्त्वपूर्ण विषयावर लिहिलेले वामन वृक्ष कला हे पुस्तक आहे. राज्यपाल पिल्लई हे प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी इतिहास, कायदा आणि राजकारणापासून अर्थव्यवस्था आणि सामाजिक घडामोडीपर्यंत विविध विषयांवर मल्याळम भाषेत १३० आणि इंग्रजीमध्ये ७० पुस्तके लिहिली आहेत.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी साहित्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, प्रत्येक जंगलात तुम्हाला मातृवृक्ष सापडेल, जे सभोवतालच्या झाडांशी नेहमीच संवाद साधत असते. हा संवाद नेहमीच मुळांच्या खाली ठेवला जातो, जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे.' मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्यपाल पिल्लई हे १९७३ पासून अव्याहतपणे लिहित आहेत. १९८५ नंतर त्यांच्या लिखाणाचा वेग वाढला. त्यात सातत्य राहिले महत्त्वाचे आहे.

गोवा मला भावतो...

उपराष्ट्रपती म्हणाले की, गोवा राज्य हे निसर्गाने भरभरून दिलेले सुंदर असे ठिकाण आहे. येथील संस्कृती तसेच मनमिळावू लोकांमुळे मला नेहमीच गोव्याचे आकर्षण वाटते.

 

Web Title: meaningful dialogue essential for strong democracy said vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा