पर्यटकांचे मृत्यू टाळण्यास उपाय, 18 हॉट- स्पॉट्सवर पोलिसांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 06:20 PM2019-11-13T18:20:18+5:302019-11-13T18:55:19+5:30

राज्यातील समुद्रात पर्यटकांचे बुडून मृत्यू होतात, ते टाळण्यासाठी नव्या पद्धतीने उपाययोजना आता सुरू झाली आहे.

Measures to prevent death of tourists, appointment of police at 18 hot spots in goa | पर्यटकांचे मृत्यू टाळण्यास उपाय, 18 हॉट- स्पॉट्सवर पोलिसांची नियुक्ती

पर्यटकांचे मृत्यू टाळण्यास उपाय, 18 हॉट- स्पॉट्सवर पोलिसांची नियुक्ती

Next

पणजी: राज्यातील समुद्रात पर्यटकांचे बुडून मृत्यू होतात, ते टाळण्यासाठी नव्या पद्धतीने उपाययोजना आता सुरू झाली आहे. उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यांवर एकूण 5 ठिकाणी नो स्वीमिंग झोनचे फलक इंग्रजी व हिंदीतून फलक लावण्याचे काम सुरू झाले आहे. या शिवाय 18 हॉट-स्पॉट्स असून तिथे जीवरक्षकांसोबतच आयआरबी पोलिसही नियुक्त केले जाणार आहेत.

नव्या पर्यटन मोसमात वेगवेगळ्या किनाऱ्यावर एकूण सात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. किनाऱ्यावर 18 अशा जागा आहेत, जिथे पर्यटक समुद्रात बुडून मृत्यू पावतात. अनेकदा देशी पर्यटक दारू पिऊन समुद्रात उतरतात व मरण पावतात. यासाठी 18 हॉट स्पॉटच्या ठिकाणी दृष्टीच्या जीवरक्षकांसोबत आयआरबी पोलिसही नियुक्त केले जाणार आहेत. नो स्वीमिंग झोनचे फलक 5 ठिकाणी लावले जातील. हिंदी व इंग्रजीतील हे फलक लावण्याचे काम सुरू झाले आहे. बागा, आश्वे, मांद्रे, मोरजी, मांद्रे व हरमल या किना:यांवर फलक लावण्यात आले आहेत. यापुढे दक्षिण गोव्यातीलही किनाऱ्यांवर फलक लावले जातील. लाल रंगाच्या या फलकांवर नो स्वीमिंग झोन असे लिहिले जाईल.

अठरा ठिकाणी पोहण्यासाठी जाणं कसे धोक्याचे आहे याची कल्पना पर्यटकांना यावी म्हणून उपाययोजना केली जात आहे. अंजुणा, वागातोर, बागा, सिकेरी येथे ज्या ठिकाणी समुद्रात खडक आहेत, तिथे पोहण्यासाठी उतरणो धोक्याचे ठरते. मोबोर व मोरजी नदीच्या बाजूची जागा व बागा खाडीची पोहण्यासाठी पूर्णपणो असुरक्षित आहे, असे दृष्टी संस्थेचे म्हणणो आहे. इथे जीवरक्षकांसोबतच आयआरबी पोलिसही नियुक्त केले गेले आहेत.

दरम्यान, 18 हॉटस्पॉट्स कोणते ते दृष्टीने जाहीर केले आहे. त्यात दक्षिण गोव्यातील पाळोळे, आगोंदा, मोबोर, कोलवा, बेतालभाटी, आरोशी, माजोर्डा, वेळसांव या भागांचा समावेश होता. तसेच उत्तर गोव्यातील हरमल, आश्वें, मांद्रे, मोरजी, अंजुणा, वागातोर, बागा, कळंगुट, कांदोळी व सिकेरी यांचा समावेश आहे.

Web Title: Measures to prevent death of tourists, appointment of police at 18 hot spots in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.