गोव्यात जन्मलेल्या 'या' मान्यवरांचा मोदींकडून आवर्जून उल्लेख
By किशोर कुबल | Published: February 6, 2024 04:18 PM2024-02-06T16:18:46+5:302024-02-06T16:18:58+5:30
गोवा हे इको टुरिझम आणि कॉन्फरन्स टुरिझम सेंटर म्हणून विकसित केले जाईल.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा आहे जागतिक पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. गानकोकिळा लता मंगेशकर, सुरश्री केसरबाई केरकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, संत सोहिरोबानाथ आंबिये, आचार्य धर्मानंद कोसंबी, कृष्ण भट बांदकर आणि इतर अनेक दिग्गज, कलाकार, संत महंत गोव्यात जन्मल्याचा उल्लेख केला.
गोवा हे इको टुरिझम आणि कॉन्फरन्स टुरिझम सेंटर म्हणून विकसित केले जाईल. नजीकच्या भविष्यात या सुंदर राज्यात अनेक परिषदा होणार आहेत, गोव्यात पर्यटन विकासासह रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मोदी म्हणाले. 'गोव्यात झालेल्या जी ट्वेंटी परिषदेने राज्याच्या विकासाचा मार्ग तयार केला. डबल इंजिन सरकार गोव्याच्या विकासाला गती देईल, असे मोदी म्हणाले.