म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार; मुख्यमंत्र्यांना विश्वास
By पूजा प्रभूगावकर | Published: November 27, 2023 03:51 PM2023-11-27T15:51:31+5:302023-11-27T15:52:24+5:30
म्हादईचा लढा आम्हीच जिंकू असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी-गोवा: म्हादई विषयी आम्ही गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयात गोवा सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडणार असून म्हादईची केस आम्ही जिंकूच असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवार २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कर्नाटकने म्हादई पाणी वळवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता सर्व भिस्त सर्वोच्च न्यायालयावर अवलंबू आहे. म्हादईच्या सुनावणीसाठी मंगळवारी ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्या नेतृत्वाखालील कायदेशीर पथक दिल्लीला रवाना होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की म्हादई प्रश्न गोवा सरकारकडून आढावा घेणे सुरुच आहे.सरकार या विषयावर पूर्णपणे गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण तयारीनिशी भक्कमपणे बाजू मांडली जाईल. गोव्याकडे म्हादई विषयी पुरेशे पुरावे सुध्दा आहेत. सर्वोच्च न्यायालयात गोव्यात लवादाच्या आदेशाविरोधात आव्हान याचिका दाखल केली आहे. न्यायालयात अशा एकूण पाच याचिका गोवा सरकारने दाखल केल्या आहेत. म्हादईप्रश्नी गोव्याची बाजू मजबूत असून आम्ही ही केस नक्कीच जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.