म्हादई पाणी तंटा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर
By वासुदेव.पागी | Published: November 30, 2023 04:50 PM2023-11-30T16:50:43+5:302023-11-30T16:51:50+5:30
६ डिसेंबर रोजी सुनावणीस येण्याची शक्यता.
पणजी: म्हादई पाणी तंटा प्रकरणात गोव्याने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या विशेष याचिकेवर गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता होती, परंतु हे प्रकरण सुनावणीस आलेच नसल्यामुळे निराशा झाली आहे. हे प्रकरण आता ६ डिसेंबर रोजी सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
कर्नाटकला कळसा भंडुरा प्रकल्पाच्या सविसस्तर आराखड्याला म्हादई पाणी आयोगाने दिलेल्या मंजुरीला आक्षेप घेताना गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण जितक्या लवकर सुनावणीला येईल तितके गोव्याच्या हिताचे आहे. कारण या या याचिकेत आयोगाच्या मंजुरीला स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. मात्र हे प्रकरण अजून सुनावणीस आलेच नाही.
यापूर्वी दोन वेळा हे प्रकरण सुनावणीसाठी लागले होते. परंतु प्रत्यक्ष सुनावणी झालीच नाही. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजीही हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, परंतु काल आणि आजही या प्रकरणात सुनावणी झालीच नाही. आता ही सुनावणी ९ डिसेंबर रोजी होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.