म्हादईचे शेवटचे आचके; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 07:06 PM2020-11-28T19:06:27+5:302020-11-28T19:06:48+5:30

Goa : म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी विविध प्रवाहांवर कर्नाटकने उभे केलेले अडथळे, खोदलेला टनेल तसेच काही प्रवाहांच्या ठिकाणी वळविलेले पाणी हे सगळे सामाजिक कार्यकर्ते प्रत्यक्ष पाहून आले आहेत.

Mhadai's last surprise; Survey by social workers | म्हादईचे शेवटचे आचके; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाहणी

म्हादईचे शेवटचे आचके; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाहणी

Next

पणजी : म्हादई नदी शेवटचे आचके कशी देत आहे ते प्रत्यक्ष गोव्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हादईच्या सर्व प्रवाहांना भेट देऊन नुकतेच पाहिले. म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी विविध प्रवाहांवर कर्नाटकने उभे केलेले अडथळे, खोदलेला टनेल तसेच काही प्रवाहांच्या ठिकाणी वळविलेले पाणी हे सगळे सामाजिक कार्यकर्ते प्रत्यक्ष पाहून आले आहेत.

गोव्याच्याबाजूने व गोवा- कर्नाटक सीमेवर म्हादई नदीची जी नाजूक व दयनीय अवस्था झाली आहे, त्याविषयीची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांच्यासोबत प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाचे प्रजल साखरदांडे, महेश म्हांब्रे, हृदयाथ शिरोडकर, रवी हरमलकर, नेहल परब आदींनी म्हादईच्या अनेक पात्रांना भेट दिली. 

कर्नाटकने सुरू ठेवलेले उपद्व्याप पाहून आम्हाला धक्काच बसला असे साखरदांडे यांनी म्हटले आहे. कणकुंबी येथे म्हादईचे पाणी वळविण्यासाठी प्रवाहाच्या ठिकाणी दगड टाकले जात आहेत. येथेच म्हादईचा पारवड प्रवाह जाऊन कळसा प्रवाहाला मिळतो. हा कळसा प्रवाहच म्हादई नदी बनून खाली गोव्यात येतो. म्हादईचे पाणी मलप्रभा नदीतही वळविण्यासाठी कर्नाटकने जो मोठा टनल खोदला आहे, त्यालाही आम्ही भेट दिली आहे, असे साखरदांडे यांनी नमूद केले.

गोव्यासाठी गंभीर अशा या सगळ्या गोष्टी असून सरकारने व लोकांनीही हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Mhadai's last surprise; Survey by social workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा