म्हादई तंटाप्रश्नी केंद्राची शिष्टाई?
By admin | Published: August 28, 2015 02:46 AM2015-08-28T02:46:14+5:302015-08-28T02:46:31+5:30
पणजी : म्हादई नदीशी संबंधित पाणी वाटपाचा आंतरराज्य वाद जर सामोपचाराने सुटत असेल, तर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची
पणजी : म्हादई नदीशी संबंधित पाणी वाटपाचा आंतरराज्य वाद जर सामोपचाराने सुटत असेल, तर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची एकत्रित बैठक बोलविण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तयार आहेत. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी दोन केंद्रीय नेतेही उत्सुक आहेत.
ज्येष्ठ भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या म्हणण्याप्रमाणे, म्हादईप्रश्नी पंतप्रधान मोदी यांना कायमस्वरूपी तोडगा निघालेला हवा आहे. त्यासाठी पंतप्रधान या तंट्यात हस्तक्षेप करण्यास तयार आहेत; पण गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकची बैठक बोलावून पंतप्रधान तोडगा काढण्यास इच्छुक आहेत. उत्तर कर्नाटकमधील लोकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या आणि जलसिंचनाच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना चिंता आहे.
अनंत कुमार म्हणाले की, लवादाच्या कक्षेबाहेरही जर म्हादई प्रश्नावर तोडगा निघत असेल तर गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची एकत्रित बैठक बोलविण्यासही हरकत नाही, असेही पंतप्रधानांचे म्हणणे आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, सामोपचाराने तोडगा निघावा म्हणून कर्नाटकच्या काँग्रेस पक्षाने गोवा व (पान २ वर)