जातीय प्रमाणपत्रावरून म्हापसाचे नगरसेवक अपात्रतेच्या वाटेवर  

By काशिराम म्हांबरे | Published: May 18, 2023 04:58 PM2023-05-18T16:58:06+5:302023-05-18T16:58:27+5:30

या संबंधी माजी नगरसेवक फ्रॅन्की कार्व्हालो यांनी तक्रार दाखल करत त्यांना देण्यात आलेल्या दाखल्याला आवाहन दिले होते.

Mhapasa corporators on the verge of disqualification over caste certificate | जातीय प्रमाणपत्रावरून म्हापसाचे नगरसेवक अपात्रतेच्या वाटेवर  

जातीय प्रमाणपत्रावरून म्हापसाचे नगरसेवक अपात्रतेच्या वाटेवर  

googlenewsNext

म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड तारक आरोलकर यांना पालिकेच्या निवडणुकी दरम्यान दिलेला ओबीसीचा दाखला समाज कल्याण खात्याच्या त्रिसदस्यीय छाननी समितीनेअवैध ठरवला आहे. या संबंधी माजी नगरसेवक फ्रॅन्की कार्व्हालो यांनी तक्रार दाखल करत त्यांना देण्यात आलेल्या दाखल्याला आवाहन दिले होते.

कार्व्हालो यांनी सादर केलेले पुरावे, संबंधीत प्रकरणातील कागदपत्रेबार्देश तालुक्याच्या उपजिल्हाधिकाºयाने दिलेला दाखल अवैध ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोलकर यांना हा दाखला एप्रिल २०२१ साली पालिकेच्या निवडणुक पूर्व देण्यात आला होता. सदर दाखल्याची योग्य तपासणी न करता उपजिल्हाधिकाºयाकडून देण्यात आला असल्याने तो रद्द करण्यात यावा असेही दाखला अवैध ठरवताना छाननी समितीने म्हटले आहे. त्यामुळेआरोलकर नगरसेवक म्हणून अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संबंधीची माहिती कार्व्हालो यांनी म्हापशात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली होती.

म्हापशातील प्रभाग ७ यातून आरोलकर पालिकेवर निवडून आले आहेत. या संबंधीची माहिती देताना कार्व्हालो यांनी आपण दाखल्याला आव्हान दिले होतेअशी माहिती दिली. आरोलकरांनी बोगस प्रमाणपत्र लावून दाखला मिळवला असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सुनावणी दरम्यान आपण सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर हा निर्णय दिल्याचे ते म्हणाले. आरोलकर यांच्या सारखे काही लोकप्रतिनिधी खोटे प्रमाणपत्र वापरून नगरसेव बनतात. त्यामुळे हे प्रकार बंद होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशावेळी देण्यात आलेला हा निवाडा बोगस लोकांसाठी चपराक आहे. बोगस प्रमाणपत्र घेण्यापूर्वी हे लोक अनेकवेळा विचार करतील अशीही माहिती त्यांनी दिली. निवाड्याची दखल घेऊन उच्च प्राधिकारणीने त्यांना तातडीने अपात्र घोषीत करावे अशीही विनंती कार्व्हालो यांनी केली. 

Web Title: Mhapasa corporators on the verge of disqualification over caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा