म्हापसा व्यापारी संघटनेचा मार्केट बंद चा इशारा
By काशिराम म्हांबरे | Published: November 6, 2023 04:14 PM2023-11-06T16:14:14+5:302023-11-06T16:14:59+5:30
मार्केटच्या तोंडावर घालण्यात आलेल्या गेट्समुळे व्यवसायावर परिणाम झालेला आहे.
म्हापसा - बाजारासाठी प्रसिद्ध अशा म्हापशातील व्यापारी संघटनेने नगर पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांची भेट घेऊन मार्केटच्या तोंडावर घातलेल्या गेट्स तातडीने हटवण्याची मागणी केली. अन्यथा मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
मार्केटच्या तोंडावर घालण्यात आलेल्या गेट्समुळे व्यवसायावर परिणाम झालेला आहे. वाहने बाजारात नेणे शक्य होत नसल्याने सामान नेण्यास अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. बाजारात पार्किंगची समस्या असल्याने इतरस्त्र रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई सहन करावी लागते. दिवाळीचा सण तोंडावर आला असता या समस्यानेमुळे व्यवसायावर परिणाम होतील. त्यात भर वाढ झालेल्या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई न होता दुर्लक्ष केले जाते.
अशावेळी व्यवसाय कशा पद्धतीने करावा अशा प्रश्न व्यापारी संघटनेचे सचिव सिद्धेश राऊत यांनी यावेळी नगराध्यक्षांकडे उपस्थित केला. यावेळी नगराध्यक्षा मिशाळ यांनी व्यापाºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांना दिले.