गोव्यात रात्रीस खेळ चाले; मगोप भाजपात विलीन, दोन आमदार फुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 06:53 AM2019-03-27T06:53:47+5:302019-03-27T07:03:49+5:30
भाजपा आमदारांचा आकडा 14 वर; सरकार स्थिर
पणजी : गोव्यात मध्यरात्री मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीत फूट पडली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचं भाजपात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे एकून तीन आमदार आहेत. यात आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
MGP MLAs Manohar Ajgaonkar & Deepak Pauskar in a letter to the Speaker of Goa Legislative Assembly: We have agreed to merge Maharashtrawadi Gomantak Legislative Party (MGP) with BJP. Total strength of Legislators of MGP is three members & we constitute 2/3rd of the members. pic.twitter.com/b2JWoX7SEi
— ANI (@ANI) March 26, 2019
Michael Lobo, Goa Dy Speaker&BJP MLA on merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: MGP's legislative wing has split. 2/3rd of MGP legislators formed a separate group&they're merging it with BJP. All formalities as per Constitution of India have been completed. pic.twitter.com/DMszKPanbJ
— ANI (@ANI) March 26, 2019
मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी मंगळवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पक्ष भाजपात विलीन करत असल्याचं पत्र सादर केले. मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी या पत्रावर सही केलेली नाही आहे. सुदीन ढवळीकर भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.
Goa CM Pramod Sawant on merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: Two MGP MLAs Manohar Ajgaonkar & Deepak Pauskar have joined BJP for the stability of the government. Automatically, our strength has grown to 14. pic.twitter.com/ByF838ftOk
— ANI (@ANI) March 26, 2019
Goa Tourism Minister & MGP MLA Manohar Ajgaonkar after merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: The next government will be formed by BJP because wherever he (PM Modi) goes, people say Modi, Modi. Because of Modi, BJP has developed in Goa. pic.twitter.com/UYyM4D7vG3
— ANI (@ANI) March 26, 2019
पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे आमदार भाजपात आल्याने गोव्यातील भाजपा सरकार आता स्थिर झालं आहे. गोवा विधानसभेत 36 सदस्यांपैकी आता भाजपाचे 14 सदस्य आहेत.
Goa Tourism Minister & MGP MLA Manohar Ajgaonkar after merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: As a Dalit, I was unsure of my existence in MGP. Bahujan Samaj leaders like Lavu Mamledar were sacked from MGP. https://t.co/AhX46lYA3X
— ANI (@ANI) March 26, 2019
Sunil Kawthankar,Goa Congress on merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: BJP has proved it's a threat to all its allies. It's clear indication to all NDA partners before LS polls that partnership with BJP will be detrimental to existence of their own party. pic.twitter.com/ayYVce2bf7
— ANI (@ANI) March 26, 2019
MGP MLA Deepak Pauskar after merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: Sudin Dhavalikar (Goa Deputy CM & MGP MLA) should be dropped now. He will be dropped during working hours today. #Goahttps://t.co/wBjjprdudD
— ANI (@ANI) March 26, 2019
सुदीन ढवळीकरांची खुर्ची धोक्यात
मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारमध्ये आपल्याला मंत्री पद दिले जाणार असल्याचा दावा दीपक पावस्कर यांनी केला आहे. तर सुदीन ढवळीकर यांची कॅबिनेटमधून उचलबांगडी होण्याची शक्यता मुख्यमंत्री कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. गोवा सरकारमध्ये सुदीन ढवळीकर सध्या उपमुख्यमंत्री पदावर काम करत आहेत.