ओल्ड गोव्यात परप्रांतीय विक्रेत्यांचे अतिक्रमण, आरजी पक्षाकडून करण्यात आली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 02:54 PM2024-01-20T14:54:56+5:302024-01-20T14:55:19+5:30
बेकायदेशीरपणे परप्रांतीय विक्रेत्यांच्या अतिक्रमणाला स्थानिक आमदार जबाबदार असल्याचे केला आरोप
नारायण गावस : पणजी गोवा: ओल्ड गोवा येथील जागतिक पर्यटन स्थळी असलेल्या चर्चकडे बेकायदेशीरपणे परप्रांतीय विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. याला ओल्ड गाेवा पंचायत तसेच स्थानिक आमदार जबाबदार आहे. या बेकायदेशीर विक्रेत्यांमुळे स्थानिक लाेकांच्या व्यावसावर फटका बसला आहे, असे आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.
मनोज परब तसेच आरजीच्या कार्यकर्त्यांनी ओल्ड गोवा येथे बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना या ठिकाणावरुन बाहेर काढले. ओल्ड येथे चर्चकडे चश्मे, टोपी, आयस्क्रीम तसेच इतर दिखाव्याचे साहित्य घेऊन विक्रेते विक्री करत असतात. त्यामुळे जे मार्केटमध्ये कायदेशीर काही दुकानदार आहे त्यांना याचा फटका बसतो. या ठिकाणी पाेलीसही तैनात केले आहेत. पण पाेलिसांकडून त्यांना या ठिकाणावरुन हाकलून लावले जात नाही. ओल्ड गाेवा पंचायत तसेच स्थानिक आमदारांना या विक्रेत्यांकडून हफ्ते मिळत असल्याने अशा प्रकारे या लोकांना येथे बेकायदेशीर व्यावसाय करायला दिला जात आहे. पण आम्ही असे परप्रांतीयांना बेकायदेशीर व्यावसाय करु देणार नाही, असे मनोज परब यांनी सांगितले.
मनोज परब म्हणाले ओल्ड गोवा हे जागतिक पर्यटक स्थळ आहे येथे लाखो पर्यटक येत असतात पण येथे हे परप्रांतीय लोक व्यावसाय करुन लाखो रुपयांची बेकायदेशीर कमाई करत असतात. याचा आम्हा स्थानिक लाेकांना काहीच फायदा होत नाही. स्थानिक लोकांच्या ापोटाच्या आड हे लोक येत आहेत. आता जर पंचायतीने याची दखल घेतली नाही तर आम्ही आरजी वाले पुन्हा या लोकांना येथून हाकलू्न लावणार आहे.
ओल्ड गोवा येथील मासळी मार्केट आहे. तिथे या स्थानिक महिलांकडून मासे विक्री केली जाते. पण काही परप्रांतीय लोक बाहेर मिळेल तिथे मासळी विक्री करत असल्याने या महिलांना गिराईक मिळत नाही. दिवसभर बसूनही मासळीची विक्री होत नाही. पण याची स्थानिक पंचायत दखल घेत नाही. हे जे बाहेरील अशी बेकायदेशीर विक्रेते विक्री करतात त्यांच्यावर काहीच कोणीही कारवाई करत नाही, असेही मनोज परब म्हणाले.