4 लाख घरांसाठी लाखो शौचालये, तरी आणखी 70 हजारांची गरज ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:29 PM2018-01-30T19:29:51+5:302018-01-30T19:29:54+5:30

गोव्यात एकूण सुमारे 4 लाख कुटूंबे असून सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या काही वर्षात हजारो घरांसाठी शौचालये बांधून दिली आहेत.

Millions of toilets for 4 lakh homes, but still need 70 thousand more? | 4 लाख घरांसाठी लाखो शौचालये, तरी आणखी 70 हजारांची गरज ?

4 लाख घरांसाठी लाखो शौचालये, तरी आणखी 70 हजारांची गरज ?

Next

पणजी : गोव्यात एकूण सुमारे 4 लाख कुटूंबे असून सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या काही वर्षात हजारो घरांसाठी शौचालये बांधून दिली आहेत. तरी देखील गोवा सरकारने आणखी 7क् हजार नवी शौचालये बांधण्याचा संकल्प सोडला आहे. चार लाख कुटूंबांसाठी आताच लाखो शौचालये गोव्यात आहेत. त्यात सरकारने आणखी 7क् हजार शौचालयांची भर टाकण्याची गरज राहिलेली आहे काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहे.

गोव्यात प्रत्येक व्यक्ती स्वत:चे घर बांधताना आता शौचालयाचीही व्यवस्था करतेच. गेल्या वीस वर्षात जी नवी घरे गोव्यात बांधली गेली आहेत, त्या प्रत्येक घरासाठी शौचालयाची व्यवस्था आहे. या शिवाय ग्रामीण भागात प्रत्येक जुन्या घराला सार्वजनिक बांधकाम खात्याने शौचालय बांधून दिले. घर मालकाने कुटूंबासाठी बांधलेले शौचालय आहे आणि बांधकाम खात्यानेही बांधलेले शौचालय आहे अशी देखील स्थिती काही गावांमध्ये आहे. काही ग्रामीण भागांमध्ये बांधकाम खात्याच्या शौचालयांचा वापर हा स्टोर रुमप्रमाणो केला जात आहे. तिथे अडचणीचे सामान आणून टाकून ते शौचालय बंद केले गेले आहे. काही शौचालयांमध्ये जळावू लाकडे ठेवली जात आहेत.

मजुरांसाठी व्यवस्था हवी 

ओपन डेफिकेशन फ्री सोसायटीच्या मते गोव्यात 7क् हजार घरांना शौचालये नाहीत. त्यामुळे सरकारने नवी 7क् हजार शौचालये बांधण्याचे ठरवले आहे. मात्र आहे त्याच शौचालयांचा वापर होत नसताना आणखी नवी 7क् हजार शौचालये बांधण्यात अर्थ आहे काय अशा प्रकारची चर्चा गोव्यात सुरू झाली आहे. कंत्रटदारांना मात्र शौचालये बांधण्याच्या नावाखाली धंदा करता येईल, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेक परप्रांतीय मजुर बांधकाम, मच्छीमारी, पर्यटन अशा व्यवसाय क्षेत्रनिमित्त गोव्यात स्थायिक झाले आहेत. यापैकी हजारो मजुर हे उघडय़ावर संडास करतात. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालयांची सोय अधिक जास्त संख्येने करण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या शहरी भागांतच सुलभ शौचालये आहेत. मजुर वर्गासाठी झोपडपट्टी भागासह अन्य ग्रामीण भागातही काही शौचालये बांधली तर ते योग्य ठरेल पण 7क् हजार शौचालयांची गरज निश्चितच भासणार नाही अशी माहिती सरकारी अधिका:यांशी चर्चा केल्यानंतर मिळते. 

उपलब्ध जागा व लोकसंख्येची घनता 

गोव्याचे क्षेत्रफळ एकूण 3 हजार 7क्2 चौरस किलोमीटर आहे. जनगणना अहवालानुसार सरासरी एक किलोमीटर चौरस क्षेत्रफळाच्या जागेत 394 लोक राहतात. गेल्या साठ वर्षात वार्षिक सरासरी 18.13 टक्क्यांनी लोकसंख्येची ही घनता प्रति चौरस किलोमीटरमागे वाढली. 88.7क् टक्के साक्षरतेचे प्रमाण असलेल्या व केवळ पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात अगोदरच काही लाख शौचालये असताना आणखी 7क् हजार नव्या शौचालयांची खरोखर गरज आहे काय असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही अधिका:यांनाही पडला आहे. 1क्5 किलोमीटर लांबीचा सागर किनारा गोव्याला लाभला आहे. या शिवाय सीआरङोड क्षेत्र, नो डेव्हलपमेन्ट झोन, अभयारण्ये, आरक्षित वन  क्षेत्र अशी मिळून 1 हजार चौरस किलोमीटर जागा ही अशी आहे, तिथे काहीच करता येत नाही. केवळ दोन ते अडिच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जागा शिल्लक राहते. या जागेत सध्या किती शौचालये आहेत याचे सव्रेक्षण सरकारने करून पाहणो गरजेचे आहे.

Web Title: Millions of toilets for 4 lakh homes, but still need 70 thousand more?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.