मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीर

By संदीप आडनाईक | Published: November 24, 2018 06:18 PM2018-11-24T18:18:32+5:302018-11-24T18:26:08+5:30

मि. परफेक्सनीस्ट म्हणून भारतात ओळखल्या जाणाºया आमीर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमीर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे.

Min Perfectionist Aamir Khan China's Uncle Meer | मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीर

मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीर

Next
ठळक मुद्देचीनी सुपरस्टार सोडून बाहेरच्या नायकाला तेथील प्रेक्षक पसंत करत आहेत,भारतीय चित्रपटांना नवे व्यासपीठ मिळाले आहेच

संदीप आडनाईक 
पणजी : मि. परफेक्सनीस्ट म्हणून भारतात ओळखल्या जाणाºया आमीर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमीर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे.

गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या फिल्म बाजारमध्ये झालेल्या ज्ञालेज सिरीजच्या फिल्म विदाउट बॉर्डर्स या सेशनमध्ये कलात्मक मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीरदिग्दर्शक आणि समीक्षक मार्को म्यूलर यांनी ही गंमतीशीर माहिती दिली. चीनमध्ये भारतीय चित्रपटांनी विशेषत: आमीर खानच्या चित्रपटांनी मिळालेल्या यशाबद्दल म्यूलर यांनी या सत्रात माहिती दिली.

पीके या चित्रपटाने सर्वप्रथम चीनमधील प्रेक्षकवर्ग खेचून घेतला. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याने उत्तम व्यवसायही केला. पीकेशिवाय थ्री इडियटस, दंगल आणि आता ठग्स आॅफ हिंदुस्थान या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा खास प्रेक्षकवर्ग चीनमध्ये निर्माण केला आहे. पीके हा चित्रपट त्यासाठी टर्निंग पॉर्ईट ठरला. 

चीनमधील प्रेक्षक आणि तेथील मार्केटमध्ये भारतीय चित्रपटांची क्रेझ पूर्वीपासूनच आहे, ह यानिमित्ताने सिध्द झाले आहे. चीनी सुपरस्टार सोडून बाहेरच्या नायकाला तेथील प्रेक्षक पसंत करत आहेत, हा एक इतर देशांसाठी नव्या अध्याय आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटांना नवे व्यासपीठी मिळाले आहेच, शिवाय त्यांचा खास असा प्रेक्षकवर्गही निर्माण झालेला आहे. 

भारत आणि चीन या दोन देशातील मूल्यांचा चित्रपटांच्या माध्यमातून प्रसार होतो आहे. आमीर खानला प्रेमाने अंकल मीर म्हणणे आणि भारतीय सिनेमांना तेथे प्रतिसाद मिळणे हे चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी चांगले आहे. यानिमित्ताने भारतीय चित्रपटांच्या कक्षा रुंदावल्या असून कोणत्याही देशाच्या सीमेचे कुंपण भारतीय चित्रपटांसाठी उरलेले नाही, असेही म्यूलर म्हणाले.

 

फिल्ममेकर्स पीच बनले निर्मात्यांसाठी नवे व्यासपीठ

पणजी : चित्रपट निर्मात्यांसाठी एनएफडीसी आयोजित फिल्म बाजारमध्ये नव्याने सुरु झालेले फिल्ममेकर्स पीच नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. फिल्म बाजारमध्ये जवळपास २0 चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आणि त्यावर सूचना केल्या.

गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग बनलेल्या १२ व्या फिल्म बाजारमध्ये एनएफडीसीमार्फत फिल्म मेकर्स पीच हे नवे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. या व्यासपीठावर चित्रपट निर्मात्यांचा चित्रपट उपस्थित प्रेक्षक पाहतात, आणि त्यांच्या काही सूचना निर्मात्याला देतात. प्रत्येक निर्मात्याला या व्यासपीठावर पाच मिनिटे बोलण्याची संधीही दिली जाते.

जवळपास पूर्णत्वास गेलेल्या निर्मात्याचा चित्रपट पाहून त्याच्या आर्थिक समस्या, वितरणाची संधी आणि विक्रीसाठी लागणारी मदत या व्यासपीठाच्या निमित्ताने या निर्मात्यांना मिळाली. अनेक प्रकल्प यामुळे मार्गी लागणार आहेत. चित्रपटांचे मार्केटिंग, त्याचे जगभरातील वितरणाचे हक्क आणि रखडलेला खर्च यावर प्रामुख्याने या व्यासपीठावर चर्चा होते आहे.

Web Title: Min Perfectionist Aamir Khan China's Uncle Meer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.